सिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व, भाजपाकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे एक ग्रामपंचायत

0
89

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडी मध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

देवगड मतदारसंघात भाजपाला बहुमत

देवगड विधानसभा मतदारसंघात आमदार नितेश राणे यांनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. देवगड तालुक्यात भाजपाने 17 ग्रामपंचायतींवर सत्ता मिळविली आहे. तर सेना 4, राष्ट्रवादी 1 आणि गाव पॅनल कडे 1 ग्रामपंचायत आली आहे.

वैभववाडी तालुक्यात 9 भाजपा आणि 4 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत. तर कणकवलीत 2 शिवसेना आणि 1 भाजपाकडे आली आहे.

मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का

मालवण विधानसभा मतदारसंघात सेनेचे आमदार वैभव नाईक यांना धक्का बसला आहे. मालवण तालुक्यात 5 ग्रामपंचायतींवर भाजपाने सत्ता मिळविली आहे. तर 1 ग्रामपंचायत सेनेकडे आली आहे.

कुडाळ तालुक्यात 4 ग्रामपंचायतींवर भाजपा, 4 सेना आणि 1 गाव पॅनल कडे आली आहे.

सावंतवाडीत माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना धक्का

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे. सावंतवाडी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या कोलगाव ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळविले तर भाजपा आमदार आशिष शेलार यांची सासुरवाडी असलेल्या दांडेली ग्रामपंचायतीवर भाजपाचे कमळ फुलले आहे. तालुक्यात 8 ग्रामपंचायती भाजपाकडे तर 3 ग्रामपंचायती सेनेकडे आल्या आहेत.

दोडामार्ग तालुक्यात 2 ग्रामपंचायती सेनेकडे तर 1 ग्रामपंचायत ग्रामविकास पॅनल कडे आली आहे. वेंगुर्ले तालुक्यात 1 सेनेकडे आणि 1 भाजपाकडे आली आहे.

एकंदर जिल्ह्यात भाजपाने आपले वर्चस्व कायम राखले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here