कोकणात रायगड व रत्नागिरीत शिवसेना तर सिंधुदुर्गात भाजपा

0
46

सिंधुदुर्ग – कोकणात ग्रामपंचायत निवडणुकीत रायगड व रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेना तर सिंधुदुर्गात भाजपाने वर्चस्व मिळविले आहे.

रायगड सेना 20 व महाविकास आघाडीकडे 19

रायगड जिल्ह्यातील 78 ग्रामपंचायतीच्या निकालात शिवसेनेने जिल्ह्याचे 20 ग्रामपंचायतीवर भगवा फडकवला आहे. तर महाविकास आघाडीनेही 19 ग्रामपंचायतीवर आपली सत्ता काबीज केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात 18 ग्रामपंचायतीवर आपली दबदबा कायम ठेवला आहे. शेकापला अलिबाग आणि पेण मध्ये 9 ठिकाणी सत्ता राखण्यात यश आले आहे. जिल्ह्यात भाजपच्या 12 ग्रामपंचायती आल्या आहेत. स्थानिक गावविकास आघाडी 6 तर तीन ग्रामपंचायतीवर त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आहे. भाजपला पनवेल सोडता इतर तालुक्यात आपले कमळ फुलविता आलेले नाही. काँग्रेस पक्षालाही मात्र एकाही ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकविला आलेला नाही. स्थानिक ग्रामविकास आघाडीला काही ठिकाणी चागले यश मिळाले आहे. जिल्ह्यात सर्वच पक्षांना मतदारांनी संमिश्र कौल दिला आहे.

सिंधुदुर्गात राणेंचेचं वर्चस्व, भाजपाकडे 43 ग्रामपंचायती तर सेनेकडे 23 ग्रामपंचायती

सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपने आपले वर्चस्व कायम राखले आहे. भाजपाकडे 45 ग्रामपंचायती तर सेनेकडे 21 ग्रामपंचायती आल्या आहेत. राष्ट्रवादीने 1 आणि गाव पॅनेलने 3 ग्रामपंचायती राखल्या आहेत. जिल्ह्यात राणेंनी आपले वर्चस्व कायम राखले आहे. मालवनमध्ये आमदार वैभव नाईक यांना तर सावंतवाडी मध्ये माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांना मोठा धक्का बसला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व

रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. जिल्ह्यातील 479 ग्रामपंचायतींपैकी शिवसेनेकडे 316 ग्रामपंचायती आल्या आहेत. तर गाव पॅनल कडे 54, भाजपकडे 23, राष्ट्रवादी काँग्रेसकडे83, काँग्रेसकडे 3, तर बीनविरोध 119 ग्रामपंचायती आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here