सिंधुदुर्गात मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, नऊ जण जखमी, दोन जण गंभीर दोन ट्रकची झाली समोरासमोर धडक

0
241

सिंधुदुर्ग – मुंबई-गोवा महामार्गावर जाणवली रतांबे व्हाल येथे सकाळी दोन ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातातील एका ट्रक मधून जाणारे चालकासह ९ जण कामगार जखमी झाले आहेत. या जखमींना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वारंवार जाणवली भागात अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनचालक व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

या अपघातात ९ जण जखमी झाले आहेत.त्यामध्ये दोघेजण गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले.तर इतरांवर कणकवली उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत .जखमींमध्ये विनायक कृष्णात चौगुले(३८),शिवाजी पाटील (२८),जयराम बामाजी लांबोरे (४१),चिरंजीव उत्तम पाटील (२६),सुशांत डॉगले (२३),रंगराव कस्तुरे (३८),मिलींद पाटील (२४),सचिन बारड (२७),विवेकानंद चौगुले (२९) आदींचा समावेश आहे.या अपघातानंतर कणकवली पोलिसांनी घटनास्थळी जाऊन वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर जखमी रुग्णांचा जाबजबाब नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास कणकवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार उतम वंजारे करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here