28.3 C
Panjim
Thursday, May 19, 2022

सिंधुदुर्गात उष्णतेची लाट, वाढत्या तापमानाचा फटका फळाचा आंबा पिकावर फळगळीत वाढ, साक्याचे प्रमाण वाढले

spot_img
spot_img
spot_img

Latest On Hub Encounter

Latest on Passay

 

सिंधुदूर्ग – अचानकपणे तापमानात वाढ झाल्याने त्याचा मोठा फटका फळांचा राजा आंबा पिकास बसला आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे झाडातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने आंबा फळगळ व फळे फुटण्याचे प्रकारात वाढ झाली आहे. या वाढत्या तापमानाचा फटका आंबा उत्पादनास बसणार असून येत्या आठ दिवसात फळगळीत वाढ होण्याची भीती आंबा बागायतदार व्यक्त करीत अहेत.

सततच्या हवामानाच्या लहरी पणाचा सर्वाधिक फटका कोकणच्या आंबा व काजू बागायतदार याना बसला आहे. अलीकडेच सातत्याने वाढलेली थँडी त्यानंतर गारपीट व अवकाळी पाऊस यामुळे केवळ २५ टक्के उत्पन्न मिळणार होते. ते अचानकपणे वाढलेत्या उष्णतेमुळे आंबा उत्पन्नात घट होणार आहे.

 

डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने शिफारशीनुसार आंब्याच्या झाडास पाणी जास्तीत जास्त द्यावे व भर दुपारी आंबे काढणी व भरणी करू नये असा सल्ला दिला आहे.

बदलत्या वातावरणाचा फटका, त्यात आंब्याचे उत्पन्न एक ते दोन महिन्यांनी उशिराने आले. त्यानंतर शेकऱ्याला काहीशी आशा होती की आलेल्या मोहोरातून काहीतरी उत्पन्न मिळेल. मात्र आंब्याचे फळ परिपक्व होत असतानाच उष्णतेची लाट आली आहे. उष्णता वाढल्याने आंब्याला ताण बसल्याने फळगळ मोठ्या प्रमाणात होत आहे. बदलतं वातावरण, अति उष्णता यामुळे आंबा बागायतदार हवालदिल झाला आहे. त्यामुळे शासनाने याकडे लक्ष द्यावे, तसेच या आंबा पिकाचा विमा काढलेला असल्याने विमा कंपन्यांनी याकडे लक्ष द्यावं. या नुकसानाची पाहणी करून विम्याच्या माध्यमातून सहकार्य करावं, अशी मागणी शेतकरी करत आहे.

सध्या काजूचा भाव गडगडला आहे. आंबा, काजूच्या बागेतून शेतकऱ्यांच वर्षांचं गणित अवलंबून असत. मात्र, यावर्षाची आर्थिक घडी विसकटल्याने मुलांचे शिक्षण, घरखर्च कसा भागणार असा प्रश्न शेतकरी विचारत आहेत. शासनाने याकडे लक्ष देऊन मार्ग काढावा, विमा कंपन्यानी नुकसान भरपाई द्यावी अथवा जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्येचे पाऊल उचलतील, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. उष्णता वाढल्याने आंब्यामध्ये साका तयार होतो. आंब्याला डाग पडायला लागतात. मोठ्या प्रमाणात फळगळ होते. त्यामुळे आंब्याचे मोठे नुकसान होत आहे.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img