26 C
Panjim
Thursday, January 20, 2022

सिंधुदुर्गतील व्यवहार टप्प्याटप्प्याने सुरू करणार, पालकमंत्र्यांचे स्पष्टीकरण

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग -जिल्ह्यातील काही व्यवहार पुढच्या आतजवड्यानंतर हळुहळू सुरू करण्याचे विचाराधीन आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करूनच निर्णय घेऊ. जिल्ह्याच्या हद्दीलगत असलेल्या राज्यातून एकाही पर्यटकाला मे अखेरपर्यंत येथे प्रवेश दिला जाणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गतील मुलांना मे नंतरच प्रवेश मिळेल असंही ते म्हणाले

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सामंत यांनी शनिवारी रात्री कुडाळ शहराला भेट देत बाजारपेठेची पाहणी केली. अधिकारी-पदाधिकारी यांच्याकडून समस्या जाणून घेतल्या. कुडाळ न. पं. ने उभारलेल्या निर्जंतुकीकरण मार्गिकेची त्यांनी पाहणी केली. तहसीलदार रवींद्र नाचणकर, पोलीस निरीक्षक शंकर कोरे, नगराध्यक्ष ओंकार तेली व मुख्याधिकारी नितीन गाढवे यांच्याकडून एकंदर व्यवस्थेबाबत माहिती घेतली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, नगरसेवक राकेश कांदे, सुनील बांदेकर व जीवन बांदेकर, युवासेना जिल्हा समन्वयक सुशिल चिंदरकर, भाजपचे जिल्हा चिटणीस बंडय़ा सावंत तसेच नागरिक उपस्थित होते.

काही विकासाची कामे, काही सिंचन प्रकल्पाची कामे सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न आहेत. अत्यावश्यक सुविधा सुरू आहेत. त्या मोठय़ा प्रमाणात सुरू करण्यासाठी प्रयत्न करू, असे पालकमंत्री म्हणाले. गोव्यात अडकलेल्या सिंधुदुर्गतील लोकांना एवढ्यात आपल्याकडे प्रवेश देणार नाही. गोवा मुख्यमंत्र्यांशी आपण याबाबत चर्चा केली आहे. आमच्या जिल्ह्यातील कामनिमित्त तेथे असलेली सुमारे 730 माणसे अडकली आहेत. त्यांना एक मे नंतर येथे आणू, तर परप्रांतीय मजुरांना घरपोच करण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -