सावंतवाडी मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर ९६६२ मतांनी आघाडीवर

0
140

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी ९६६२ मतांची आघाडी घेतली आहे. केसरकर हे महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री आहेत. त्यांच्या विरोधात एके कालचे त्यांचे खास समर्थक मानल्या जाणाऱ्या बबन साळगावकर याना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. तर भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून राजन तेली रिंगणात आहेत.

गोव्यातीचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या पत्नीने आणि काही मंत्र्यांनी या ठिकाणी दीपक केसरकर यांच्याविरोधात राजन तेली यांच्यासाठी प्रचार केला होता.  त्यामुळे हि लढत महत्वाची ठरली आहे. केसरकर तिसऱ्यांदा विजयी होत महाराष्ट्राच्या राजकारणात गृहराज्यमंत्री झालेला मंत्री पुन्हा निवडून येत नाही हा इतिहास बदलतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here