कणकवलीत नितेश राणे यांचा २५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय

0
131

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विधानसभेची लढत लक्षवेधी ठरली. याठिकाणी भाजपचे उमेदवार आणि नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी २५ हजारांपेक्षा जास्त मताधिक्याने विजय मिळविला आहे. नितेश राणे यांनी सुरवातीपासूनच मतमोजणीत आघाडी घेतली होती.

शिवसेना-भाजपाच्या महायुतीत वादग्रस्त ठरलेल्या जागेपैकी एक म्हणजे कणकवली मतदरासंघ आहे. भाजपाने नितेश राणे यांना उमेदवारी दिली असली तरी शिवसेनेकडून नितेश राणे यांच्याविरोधात सतीश सावंत यांना उमेदवारी दिली होती. यामुळे ही निवडणूक शिवसेना विरुद्द भाजपा अशी होती. कणकवलीत काँग्रेसकडून सुशील राणे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर मनसेकडून राजन दाभोळकर यांना उमेदवारी देण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here