20.3 C
Panjim
Monday, January 24, 2022

सावंतवाडीत लॉकडाऊन कडक, मास्कशिवाय फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरना रुग्ण संख्या त्रिशतकाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता आरोग्य यंत्रणेसह सर्वच शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने सावंतवाडी पोलिसांकडून संचार बंदीची कडक अंमलबजावणी केली गेल्याने रविवारी सुटीच्या दिवशी देखील शहरात नागरिक सोशल डिस्टन्सचे नियम पाळताना दिसले. दोनच दिवसापूर्वी लॉकडाऊन असतानाही सावंतवाडी शहरात गर्दी दिसून आली होती.

सावंतवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार विशेषतः मच्छी मार्केट व गांधी चौक परिसर तसेच भाजी मार्केट परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवून कारवाईचा बडगा उगारला. संचार बंदीच्या काळात मास्क न लावून फिरणाऱ्या 14 जणांवर दंडात्मक कारवाई पोलिसांकडून करण्यात आली. तर रविवार सुट्टीचा दिवस असल्याने चिकन मार्केटमध्ये गर्दी होऊ नये यासाठी वाहनांची पार्किंग व्यवस्था तसेच सोशल डिस्टन्स पाळण्याची सूचना पोलिसांकडून देण्यात आल्याने मच्छी मार्केट व चिकन सेंटर परिसरात पोलिसांना गर्दीवर नियंत्रण आणता आले. तसेच पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने सावंतवाडी शहरात नागरीक सोशल डिस्टन्स चे पालन करताना दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -