सावंतवाडीत गणपतीच्या माटीत चक्क तीन दिवस नागराजांचा मुक्काम

0
270

सिंधदुर्ग – घरात विद्यमान झालेल्या गणपती बाप्पाच्या माटीवर चक्क नागराजाने एक नव्हे दोन नव्हे तर तीन दिवस मुक्काम केल्याचा प्रकार सावंतवाडी तालुक्यातील एका गावात घडला आहे. विशेष म्हणजे हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्या घरातील लोकांनी इमर्जन्सी रेस्क्यू सर्विसेस सिंधुदुर्ग या टिमची मदत घेऊन त्या नागराजाला अलगद बाहेर काढले. घरात गणपती स्थानापन्न झाल्यामुळे माठी हलवू नये, गणपतीचा पाट हलू नये, अशी अनेक दिव्ये सांभाळून या नागराजाला बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले.

आपली भारतीय संस्कृती जगात वंदनीय आहे कारण निसर्गातील प्रत्येक घटकाला येथे स्थान आहे.सद्या कोरोनाच्या साथीतही घरोघरी बाप्पाचं आगमन झालं असून सगळीकडे अगदी आनंदी वातावरण आहे. पण सावंतवाडी तालुक्यातील मातोंड मार्गे गोव्याला जाताना लागणाऱ्या एका गावात नागदेवता चक्क तीन दिवस बाप्पासोबत वास्तव्यास आली ती एका घरात. त्या घरात प्रतिवर्षाप्रमाणे बाप्पाचं यथाविधी पूजन करण्यात आलं आणि आकर्षक असा देखावा बाप्पासामोर साकारला गेला. घरात कस चैतन्यमय वातावरण होत..आणि त्या दरम्यान एक नाग जातीचा साप घराच्या छपरावरून खाली कोसळला आणि थेट बाप्पाच्या देखाव्यात शिरला आणि तब्बल तीन दिवस वास्तव्यास राहिला.

आपल्या समजुतीप्रमाणे आपण एकदा बाप्पाचं पूजन केलं की सामान एका जागी स्थिर ठेवतो..देखावा आणि इतर सामान बाजूला काढुन सापाला सुखरुप बाहेर काढावं कसं? असा यक्ष प्रश्न कुटुंब प्रमुखासमोर उभा राहिला … शेवटी त्यांनी आधार शोधला तो वाईल्ड लाईफ इमर्जन्सी रेस्क्यू सर्व्हिसेस, सिंधुदुर्ग या टीम चा, या टीम ला फोन वरून माहीती मिळताच तात्काळ पाचारण करण्यात आले. सदर माहिती मिळताच टीम चे अध्यक्ष अनिल गावडे,महेश राऊळ, वैभव अमृस्कर, नाथा वेंगुर्लेकर, दीपक दुतोंडकर घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. देखाव्याला तसेच कोणत्याही सामानाला जाग्यावरुन न हलवता त्या सापाला बाहेर काढनं वाईल्ड लाईफ टीम साठी एक प्रकारे चँलेंज होत आणि ते स्विकारुन दोन तासांच्या अथक प्रतीक्षेनंतर सदर नाग चक्क बाप्पाच्या बैठकीच्या पाटाखालून काहीही सामान व देखावा न हलवता सुखरूप बाहेर काढण्यात टीमला अखेर यश आलं. आणि सर्वांनी निःश्वास सोडत गणरायाला वंदन करुन त्या नंतर या सापाला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. या आगळ्यावेगळ्या अनुभवाबद्दल अध्यक्ष अनिल गावडे यांनी मंनोगत व्यक्त करताना सांगितलं की वाईल्ड लाईफ ची टीम अशा कामासाठी कटीबद्ध असून वन्यजीव व निसर्ग रक्षणासाठी कधीही हाक द्या आंम्ही कायम मदतीसाठी उपलब्ध आहोत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here