सावंतवाडीतील मोती तलाव मृतदेहांचे हॉटस्पॉट बनतोय.. अभिषेक मिस्त्री बाजारात जातो म्हणून सांगून गेला तो माघारी परतलाच नाही

0
11989

सिंधुदुर्ग : सावंतवाडीतील शहराच्या भोवताली असलेलं मोती तलाव हे मृतदेहांचं हॉटस्पॉट बनत असलेलं पाहायला मिळत आहे .गेल्या वर्षापासून मोती तलावामध्ये मोठ्या प्रमाणावर आत्महत्या किंवा अन्य कारणास्तव मृतदेह आढळून आले आहेत मात्र यावरती कोणतीही नगरपरिषदने किंवा पोलिसांनी उपाययोजना केलेल्या नाहीत. तसेच प्रत्येक महिन्यामध्ये एक दोन एक दोन असे मृतदेह या तलावामध्ये नेहमीच आढळून आले आहेत त्यामुळे सुसंस्कृत असलेल्या सावंतवाडी शहर या तलावामुळे बदनाम होताना पाहायला मिळत आहे.

सावंतवाडी येथील तलावात वराड-मालवण येथील तरूणाचा मृतदेह आढळून आला. अभिषेक अंकुश मेस्त्री (वय ३५) असे त्याचे नाव आहे. तो गेली काही वर्षे कोलगाव येथे राहत होता. दरम्यान फिट आल्यामुळे तो तलावात कोसळला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला होता,ही घटना आज सकाळी उघडकीस आली. तो काल दुपारपासून बेपत्ता होता. दुपारी आपण बाजारात जातो, असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. आज त्याचा मृतदेह तलावात आढळून आला. याबाबतची माहिती ठाणे अमलदार मनोज राऊत यांनी दिली. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालदार महेश जाधव आणि उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार ,तरुण मूळ वराड-मालवण येथील आहे. तो कोलगाव येथे गेले काही दिवस स्थायिक झाला होता.गवंडीकाम कामगार असलेला सदर तरुण मोती तलावाच्या काठावर बसलेला असताना तलावात कोसळला असावा असा अंदाज सावंतवाडी पोलिसांनी व्यक्त केला होता काल दुपारपासून तो बेपत्ता होता . दुपारी आपण बाजारात जातो असे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. दरम्यान ,काल कोलगावची जत्रा असल्याने तो जत्रेला गेला असावा असे घरच्यांना वाटले. परंतु रात्री उशिरा देखील तो घरी परतलाच नाही. दरम्यान आज सकाळी सावंतवाडी नगरपालिकेचे कर्मचारी मोती तलावात साफसफाईसाठी उतरले असता त्यांना हा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळला . त्यांनी त्वरित पोलिसांना कळविल्यावर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला. सावंतवाडी पोलीस पुढील तपास करीत आहेत. त्याच्या पश्चात, पत्नी, दोन मुली, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here