वेंगुर्ला तुळस येथे आढळला अतिदुर्मिळ कॅस्ट्रो कोरल स्नेक

0
115

सिंधुदुर्ग : वेंगुर्ला तुळस राऊळवाडा येथील महेश राऊळ यांना कॅस्ट्रो कोरल स्नेक ज्याला मराठीमध्ये पोवळा साप असे म्हटले जाते ही अतिशय दुर्मिळ सापाची प्रजाती आढळून आली आहे.

महेश राऊळ हे गेली अनेक वर्ष भरवस्तीत आलेले साप जंगलात सोडतात. ते परिसरामध्ये सर्पमित्र म्हणून सुपरिचित आहेत. त्याशिवाय भटके प्राणी असतील किंवा वन्यप्राणी तसेच जखमी प्राणी यांच्यावर उपचार करण्यासाठी सुद्धा महेश राऊळ नेहमी अग्रस्थानी असतात.

सिंधुदुर्गमध्ये केवळ दुसऱ्यांदा या सापाची नोंद झाली असल्याचे वन्यप्राणी अभ्यासक हेमंत ओगले यांनी सांगितले आहे. हेमंत ओगले यांनी या सापाचे संशोधन केले आहे. विषारी प्रजातीमध्ये मोडला जाणार हा साप फारसा दृष्टीस पडत नाही.

वरून बघितल्यानंतर मन्यार सारखा दिसणारा हा साप पोटा खालून पूर्णपणे भगवा असतो. त्याचा हा भगवा रंग हा तो जहाल विषारी असल्याचे द्योतक मानले जाते.

दगड खाली आणि पालापाचोळा खाली हा साप नेहमी राहतो. त्याचे भक्ष छोटे बेडूक, सरडे, पाली, गांडूळ इत्यादी आहे. साधारणपणे दोन ते अडीच फुटापर्यंत या सापाची लांबी असते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here