विनायक राऊत तुम्ही शिवसैनिकांची माफी मागा अन्यथा आम्ही तुम्हाला चप्पलेने झोडुन – माजी आमदार प्रमोद जठार

0
152

 

विनायक राऊत तुम्ही शिवसैनिकांची माफी मागा अन्यथा आम्ही तुम्हाला चप्पलेने झोडुन काढू असे प्रति आव्हान माजी आमदार प्रमोद जठार यांनी डोंगर तिठा येथे नानार रिफायनरी प्रकल्प समर्थकांच्या सभेत केले.

ते पुढे म्हणाले जो लक्ष्मीला धुडकावून लावतो त्याच्या घरात कधीच लक्ष्मी नांदणार नाही भूमिपुत्र श्रीमंत झाला पाहिजे, रिफायनरी झाला तर परप्रांतात गेलेल्या लोकांची घरवापसी होईल आंतराष्ट्रीय दर्जाचे पोर्ट उभारावा अशी मागणी मी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना देखील मी रिफायनरी प्रकल्पाच्या संदर्भात भेटलो राजकिय कार्यकर्त्यानी बार्गेनींग केल्यामुळेच एनरॉन प्रकल्प रद्द झाला आता रिफायनरी प्रकल्पात स्थानिक सर्वसामान्य जनतेसाठी बार्गेनींग झाले पाहिजे अद्ययावत हॉस्पिटल उभारण्यासाठी केंद्र सरकार कटीबद्ध असून, स्मार्ट सिटी उभारा आणि त्यानंतर प्रकल्प सुरु करा अशी मागणी आमची आहे.

यावेळी त्यांनी मंत्री सामंत यांच्यावर टीका केली. उदय सामंत तुझ्यात हिंमत आहे काय जागा घेतल्या ऊद्धव ठाकरेंच्या नातेवाईकांनी आणि आरोप करतात माझ्यावर असा प्रश्न विचारतानाच आमदार राजन साळवी यांच्याही मनात रिफ़ायनरी झाली पाहिजे असे आहे. तेव्हा तुम्ही घाबरु नका, रिफायनरी प्रकल्पाचे बिनधास्त समर्थन करा. कोकणातील ८० टक्के घरे बंद आहेत,ती रोजगार नसल्याने, त्यामुळे नाणार प्रकल्प झाल्याशिवाय राहणार नाही. राऊत साहेब तुम्ही निवडून यायला आम्हीच सहकार्य केलय २०२४ ला तुम्ही पुन्हा निवडून येणार नाही. सामनाच्या पहिल्या पानावर जाहिरात आली. त्यामुळे ऊद्धव ठाकरे या प्रकल्पाचे खरे समर्थक आहेत. असे बोलतानाच संजय राऊत जनतेच्या पोटापाण्याचा प्रश्न कधी सोडवणार? सामनाच्या पोटापाण्याचे प्रश्न नुसते सोडवू नका आम्हिच आता तुम्हाला झोडू, तुम्ही जाहिर माफी मागा हा शब्द प्रमोद जठारचा आहे असे ते म्हणाले

यावेळी सिंधुदुर्ग भाजप अध्यक्ष माजी आमदार राजन तेली, रत्नागिरी जिल्हा भाजपा अध्यक्ष प्रदीप पटवर्धन, शिवसेनेच्या जिप सदस्य लक्ष्मी शिवलकर आदी उपस्थित होते.

कोकण जनकल्याण प्रतिष्ठान चे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर यानी ग्रीन रिफायनरी प्रकल्प राजापूर तालुक्यात व्हावा यासाठी ठराव मांडला तो ठराव या सभेत सम्मत करण्यात आला असून त्या ठरावाला सर्व उपस्थितानी हात उंचावून अनुमोदन दिले व ठराव सर्वानुमते सम्मत करण्यात .

खासदारांच्या इशाऱ्याला न जुमानता शिवसैनिकही रिफायनरी समर्थनाच्या सभेत

खासदार विनायक राऊत यांनी दिलेले कारवाईचे आदेश न जुमानता अनेक शिवसैनिक रिफायनरीच्या समर्थन सभेला हजर होते. विशेष म्हणजे शिवसेनेचा गमछा आणि टोपी घालून अनेक शिवसैनिक या सभेत सहभागी झाले होते. पालये, सागवे, विलये, साखरी नाटे, आंबोलगड, डोंगर या व अन्य भागातील शिवसैनिक या सभेसाठी उपस्थित होते. या शिवसैनिकांनी खासदार विनायक राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.

माझ्यावर झालेली कारवाई अयोग्य, राजीनामा देणार नाही – लक्ष्मी शिवलकर

रिफायनरीचे समर्थन करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य लक्ष्मी शिवलकर यांची शिवसेना पक्षप्रमुखांच्या आदेशाने हकालपट्टी करत असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी नाणार विरोधाच्या मेळाव्यात जाहीर केले. दरम्यान, याबाबत मंदा शिवलकर यांनी आज आपल्यावर झालेली करवाई अयोग्य आहे, आपण बाळासाहेबांचे सच्चे शिवसैनिक आहोत, त्यामुळे पक्षातून हकालपट्टी झाली तरी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार नाही अशी भूमिका स्पष्ट केली आहे.

खासदार विनायक राऊत यानी राजीनामा द्यावा व पुन्हा निवडून यावे मग त्याना किती प्रकल्पाला विरोध आहे ते कळेल . आम्हाला ग्रीन रिफायनरी प्रकल्प आम्हाला हवा आहे त्यामुळे आम्ही शिवसैनिक असलो तरी या समर्थन मेळाव्याला उपस्थित आहोत .
– सुरेश पारकर, वाडापाल्ये सागवे .

ज्या खासदाराना आम्ही आमच्या चप्पल झिझवल्या त्या खासदारानी आम्हाला चप्पलेने मारण्याची भाषा करणे दुर्दैवी आहे . त्यांच्या या वक्तव्याची त्याना लवकरच चांगलीच प्रचीती येइल .
– सुहास तावडे,विलये ग्रामस्थ, माजी नगरसेवक मुंबई व माजी राजापूर तालुका संपर्क प्रमुख

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here