26.6 C
Panjim
Wednesday, June 29, 2022

विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला, शिवसेनेत मोगलांच राज्य माजी खासदार निलेश राणेंनी शिवसेनेला पुन्हा डिवचले

spot_img
spot_img
spot_img
spot_img

सिंधुदुर्ग – शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला अशा एकेरी शब्दात बोलतानाच बाळासाहेब गेले तेव्हाच त्यांची शिवसेना संपली आता मोगलांचा राज्य आहे तिकडे अशी टीका करत पुन्हा एकदा माजी खासदार निलेश राणे यांनी शिवसेनेला डिवचले आहे.

शिवसेनेची आणि विनायक राऊत यांची औकात नाही

शिवसेना राणेंच काही करू शकत नाही. माझा एक पुतळा जाळला असेल विनायक राउतला आम्ही 10 वेळा जाळला. एवढी औकात शिवसेनेची पण नाही आणि विनायक राऊतची पण नाही. विनायक राऊत आणि शिवसेनेचा मी रोज वचपा काढणार. 2024 खूप लांब आहे. ग्रामपंचायतीमध्ये आडवच केलं ना आम्ही शिवसेनेला. त्यामुळे आता 2024 पर्यंत शिवसेना कुठेच ठेवायचं नाही हे आमचं ठरलं आहे असं सांगतानाच शिवसेनेचे फक्त 56 आमदार आहेत ते घालवायला किती वेळ लागतो असं ते म्हणाले. त्यावेळी भजप सोबत होती म्हणून 56 आले असेही ते म्हणाले.

सुशांत, दिशाच्या प्रकरणात आदित्य ठाकरे

सुशांतसिंग राजपूत, दिशा सालीयान प्रकरणामध्ये आम्ही आदित्य ठाकरे यांचे नाव घेतलेलेच आहे. या दोघांच्याही घराच्या आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहे. आम्ही त्याच भागात राहतो त्यामुळे आम्हाला सगळं माहीत आहे.किमान 30 ते 40 सीसीटीव्ही कॅमेरे आहेत गेले कुठे. हे कोणासाठी झाकलं गेलं हे लोकांना कळलेलं आहे. बिहार निवडणुकीत आदित्य ठाकरे प्रचाराला जाणार अशी घोषणा झाली मात्र हे भिऊन मातोश्रीच्या बाहेर पडले नाहीत. असा टोलाही त्यांनी लगावला.

शिवसेनेत सगळे जनाब आहेत

बाळासाहेबांची शिवसेना ते गेले तेव्हाच संपली आता तिकडे सगळे जनाब आहेत. अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर टीका केली. बाळासाहेबांना जनाब म्हणणारे लोक आता आले आहेत शिवसेनेमध्ये. त्यांच्याकडून तुम्ही शिवशाहीची अपेक्षा ठेऊ नका. मोगलांचा राज्य आहे. औरंगाबादचे अजूनही ते संभाजीनगर करू शकले नाहीत. काँग्रेस वाल्याना औरंगजेब जास्त जवळचा आहे. पण शिवसेना काही बोलू शकत नाही कारण कुबड्यांचं सरकार आहे. असेही ते म्हणाले.

elthor-showroom-ad
triumph-high school-ad

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
- Advertisement -spot_img
spot_img
spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

More Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img