27 C
Panjim
Friday, January 21, 2022

लॉक डाऊन मध्ये अडकलेल्या सिंधुदुर्गातील हापूसला प्रशासनाचा मदतीचा हात

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – कोरोन विषाणूचा प्रादुर्भाव आणि लॉकडाऊन मुळे सिंधुदुर्गातील नाशिवंत फळ म्हणून ओळख असलेल्या आंब्याला चांगलाच फटका बसला आहे. आंबा बागायतदाराला वाचविण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न केले जात असून जिल्हा कृषी विभागानेही मोठा हातभार लावत बगतादारांचा आंबा बाजारपेठेत पाठविला आहे. जिल्हाधिकारी के मंजुल्क्ष्मी यांच्या सूचनेनुसार जिल्हा कृषी विभागाने पासचे वितरण करून १ हजार ५९० टन आंबा स्वताच्या अखत्यारीत पाठविला आहे.

एकूण १ हजार १३० वाहनांमधून ८८ हजार ३६२ पेट्या जिल्हा प्रश्नाच्या माध्यमातून विक्रीसाठी गेल्या आहेत. त्याशिवाय स्वतः शेतकरी व शेतकरी समूहामार्फात स्थानिक व जिल्ह्य बाहेरील बाजारपेठेमध्ये सुमारे ५ हजार टन आंब्याची विक्री करण्यात आली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बागल यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -