24.3 C
Panjim
Sunday, November 27, 2022

राणे कुटुंबाला त्रास देण्यासाठी ठाकरेची सुडबुद्धी काम करते – भाजपा नेते प्रमोद जठार

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – सरकार हे सूडबुद्धीने काम करत आहे.राणे आणि राणे कुटुंबाल त्रास देण्यासाठी ठाकरे सरकारने सर्व मंत्र्यांना कामाला लावले आहे. दुष्ट बुद्धीने काम करणाऱ्यां मंत्र्यांनचा न्यायालयावर सुद्धा दबाव आणला जात आहे.म्हणून तर केस कोणत्या कोर्टात घ्यावी आणि कोणत्या कोर्टात घेऊ नये अशी मागणी केली जाते.राणेंना अटक करणे हा एकमेव मुद्दा ठाकरे सरकारचा आहे.भाजपणे या सर्व गोष्टींची गंभीर दाखल घेतली आहे. “मोका सभीको मिळता है..!”असे सांगत, तेव्हा जशास तसे उत्तर दिले जाईल.असा इशारा भाजपा प्रदेश चिटणीस माजी आमदार प्रमोद जठार यांनी दिला.

कणकवलीत ते पत्रकार परिषदेत बोलत होते.यावेळी भाजपा अध्यक्ष ,उपसभापती मिलिंद मेस्त्री,शहर अध्यक्ष अण्णा कोदे,रवींद्र शेट्ये,नगरसेवक शिशिर परुळेकर,समर्थ राणे आदी उपस्थित होते.
राणेंना अडकविण्याचे हे प्रकरण कोण मंत्री हाताळतो हे सर्वांना माहीत आहे.ठाकरे कुटुंबाची शाबासकी घेण्यासाठी अनिल परब,उदय सामंत यांची ही सर्व धडपड सुरू आहे.हे दोन्ही मंत्री पालकमंत्री म्हणून फेल गेले आहेत.त्यामुळे राणेंना त्रास देण्याची स्पर्धा चालू आहे.अशी टीका यावेळी श्री.जठार यांनी केली.

आमदार नितेश राणे यांच्या अटकेचे प्रकरण सरकार किती प्रतिष्ठेचे करावे.किती त्रास द्यावा.जिल्हातील एका ही वकिलाला सरकारी वकील पत्र दिले नाही.जिल्ह्यातल्या प्रशासन, आरोग्य, पोलिसांवर सुद्धा विश्वास नाही.जर या सरकारचे कोर्टावर सुद्धा विश्वास नसेल तर जनतेने या सरकारवर कसा विश्वास ठेवावा असा संतप्त सवाल प्रमोद जठार यांनी केला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकासाचा कार्यक्रम कमी आणि राणे कुटुंबाच्या मागे लागण्याचाच कार्यक्रम जास्त आहे.माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आपण पालकमंत्री असतो तर काय केले असते.पूर्वी राणेंना कसा त्रास दिला हे सांगून आताचे पालकमंत्री सामंत अपयशी असल्याचे सांगितले आहे.कारण केसरकर यांनची महाभारत मधील अश्वत्थामा सारखी अवस्था झाली आहे.

त्यांना मंत्री पद दिले नाही दुःखाची भलभलती जखम घेऊन फिरत आहेत.ते अस्वस्थ आहेत.अशी टीका केली.
दारूचा महापूर आणायचा आणि दुधाचा उत्पादन करणारा शेतकरी मारायचा हे धोरण राज्यात सुरू आहे. मुख्यमंत्री आहेत कुठे ? सेनापती पद जनतेने दिले ते घरी बसण्यासाठी काय ? जनता संकटात आहे तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला खरी गरज मुख्यमंत्र्यांची आहे. तुम्ही गावा गावात या, तुम्ही घाबरू नका.कोणी तुम्हाला धक्काबुक्की करणार नाही.महाराष्ट्र संकटात असतांना राज्याचा सेनापतीच घरी बसून आहेत.

सतीश सावंत काय आणि संदेश पारकर काय ही सर्व मंडळी नाम.नारायण राणे यांचे लाभार्थी आहेत.लाल दिव्यांची गाडी दिसताच त्यांची सर्व कृती क्षणात थांबते.जे वाईट कृत्य करतात ते आत्मक्लेश करत असतात. पारकर यांचा बोलवत धनी त्याचा भाऊ आहे त्याचे ऐकणे बंद करा म्हणजे मोठा होशाल असा टोला प्रमोद जठार यांनी पारकर यांना हाणला.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img