युतीला मदत करण्यासाठी १५ अपक्ष संपर्कात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

0
155

राज्यात शिवसेना भाजपा युतीला चांगलं यश मिळालं आहे. त्याचं विश्लेषण आता करणार नाही. परंतु शिवसेना भाजपाच्या सत्तास्थापनेइतके संख्याबळ आहे. परंतु बंडखोरी करून विजय मिळवलेल्या १५ जणांशी आपला संपर्क झाला असून ते सरकार स्थापनेसाठी मदत करणार असल्याचा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

“तिकिट वाटपानंतर काही जणांनी आमच्याविरोधात बंडखोरी केली. परंतु ते सर्व आमचेच आहेत. त्यांपैकी १५ जणांशी संपर्क झाला असून आता ते सरकार स्थापनेसाठी मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तसंच शिवसेनेबरोबर आमचं जे ठरलंय त्यानुसार आम्ही पुढे जाणार आहोत. काय ठरलं आहे ते योग्य वेळी आम्ही उघड करू,” असं त्यांनी नमूद केलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here