मुंबईनजीक पालघर जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, जनतेत घबराट

0
151

गेल्या दीड वर्षांपासून पालघर जिल्ह्यात भूकंपाच्या धक्क्यांचं सुरू असलेलं चित्र अद्यापही कायम आहे. शनिवारी पाहटे पुन्हा एकदा पालघर जिल्ह्याला भूकंपाचे धक्के बसले. पालघरमधील डहाणू, कासा, तलासरीतील परिसर भूकंपाचे धक्क्याने हादरले. जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे धक्के बसले असले तरी नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

शुक्रवारी सकाळी आणि शनिवारी पहाटे पालघर जिल्ह्यात सौम्य स्वरूपाचे भूकंपाचे पाच धक्के जाणवले. शनिवरी पहाटे जिल्ह्यात दोन भूकंपाचे धक्के जाणवल्याची नोंद गुजरात सिसमोलोस्टिक रिसर्च सेंटरकडून करण्यात आली आहे. शनिवारी पहाटे ४ वाजून ६ मिनिटांनी कासा, चारोटी, पेठ, शिसने, आंबोली या ठिकाणी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. दरम्यान, यानंतर नागरिकांमध्ये भितीचं वातावरण पसरलं आहे.

शुक्रवारी २.६, २, २, २.४, १.८, १.९ रिश्टर स्केलचे पाच धक्के पालघर जिल्ह्यात जाणवले होते. यापूर्वी पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी हा भाग बुधवारी रात्री पुन्हा एकदा भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला होता. या भूकंपाची २.९. रिश्टर स्केल इतकी तीव्रता नोंदविण्यात आली होती. रात्री ९ वाजून ५७ मिनिटांनी हे भूकंपाचे धक्के जाणवले होते. पालघर जिल्ह्यातील डहाणू भागात गेल्या काही दिवसांपासून भूकंपाचे लहान- मोठे धक्के बसत आहेत. हा भाग भूकंप प्रवण क्षेत्र-३ मध्ये येत असला, तरी स्वातंत्र्योत्तर काळापासून प्रथमच भूकंपाचे धक्के बसल्याने भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या तज्ज्ञांच्या पथकाने या भागाची पाहणी देखील केली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here