मांद्रे सरपंच बाळा नाईक यांचा पार्सेत सत्कार

0
91

पार्से: चोनसाई वाडा येथे श्री महापुरूष देवाच्या २८ व्या वर्धापनदिन सोहळ्यात मांद्रे पंचायत सरपंच प्रशांत उर्फ बाळा नाईक यांचा आमदार जीत आरोलकर यांच्याहस्ते सत्कार करण्यात काला. दरम्यान बाळा नाईक यांनी उत्कृष्ट कामगिरी केल्याचे गौरोदगार आरोलकर यांनी काढले.

यावेळी आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले की, पार्से चोनसाई ते मांद्रे नाईकवाडा मार्ग गोवा मुक्तीपासून अंधारात होता. या अंधारमय मार्गाला उजेडात आणण्याचे काम बाळा नाईक यांनी केले. त्यांनी सदर मार्गावर विजखांब लावून वीज येईपर्यंत कामाचा पाठपुरावा केला. तसेच रस्ता रुंदीकरण होईपर्यंत त्याचाही पाठपुरावा त्यांनी केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here