मंत्री अनिल परब यांची सिबीआय चौकशी करा, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांचेकडे मागणी – प्रमोद जठा

0
107

 

पसिंधुदुर्ग – केंद्रीयमंत्री नारायण राणे संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजे महाराज याच्या दर्शनासाठी जात असताना रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक रोहितकुमार गर्ग हातघाईला आले होते.

पोलीस अधिक्षक त्यावेळी दबावाखाली वावरत होते. नंतर मंत्री अनिल परब यांचा व्हिडिओ सर्वांनी पाहिला. आणि मोगलाई जगजाहीर झाली.

त्या मंत्री अनिल परब आणि पोलीस अधीक्षक रोहितकुमार गर्ग यांची सिबीआय चौकशी करा. अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.

असे भाजपा प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली. सिंधुदुर्ग मध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

तर राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (२७) रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत नारायण राणे रत्नागिरीत यात्रा करतील.

त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांचे आगमन होणार आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात दोन दिवस यात्रा करून सांगता होणार आहे. असेही यात्रा संयोजक प्रमोद जठार यांनी सांगितले.

केंद्रीय मंत्री म्हणून कोणत्याही प्रोटोकॉलचे पालन न करता पोलिसांनी अतिरेक्यांप्रमाणे वागणूक दिली. जेवताना दरवाजा तोडू, असे एसपींनी मेगा फोनवरून जाहीर केले.

कायद्याचे रक्षक असणारे एसपी, पोलिस शिवसेना शाखाप्रमुखाप्रमाणे वागत होते.

पोलिस बंदोबस्तात रस्त्यावरची पोस्टर्स फाडली जात होती. असे सांगतानाच गृहमंत्री अमित शाह यांनी राणे यांची दूरध्वनीवरून चौकशी केली.

त्यांच्या तब्बेतीविषयी विचारतानाच आपण घाबरू नका. ही यात्रा पुढे सुरू ठेवा. आम्ही आपल्या पाठीशी आहोत. असे राणे यांना सांगितले असल्याचे जठार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here