26.6 C
Panjim
Monday, November 28, 2022

भुईबावडा घाट प्रशासनाने मातीचा ढिगारा टाकून केला बंद

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – जिल्हा आणि कोल्हापूरला जोडणारा भुईबावडा घाट मुख्य रस्त्यावर मातीचा आडवा ढीग टाकून हा रस्ता वाहतुकीला बंद करण्यात आले आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अवजड वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. तर गगनबावडा इथुन भुईबावडा बाजारपेठमध्ये येणाऱ्या नागरिकांना बाजारासाठी येत येणार नाही. हा रस्ता 30 एप्रिल पर्यत बंद असणार आहे. दरम्यान अचानक हा निर्णय घेण्यात आल्याने भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांना घाटमार्ग पार करून ही पुन्हा माघारी फिरत पर्यायी मार्गे कोल्हापूर गाठावे लागत आहे.

अचानक निर्णय घेतल्याने अनेकांची झाली अडचण

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर तळकोकणातुन जाणारा भुईबावडा घाट मातीचा ढिगारा टाकून बंद करण्यात आला आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोल्हापूर प्रशासनाने कडक पाऊले उचलली आहेत. करूळ व भुईबावडा या दोन घाटापैकी कोल्हापूर प्रशासनाने भुईबावडा घाट बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गगनबावडा – खारेपाटण राज्य मार्गावरील वाहतूक पूर्ण ठप्प झाली आहे. अचानक हा निर्णय घेण्यात आल्याने भुईबावडा घाटमार्गे कोल्हापूरला जाणाऱ्या वाहनांना घाटमार्ग पार करून ही पुन्हा माघारी फिरत पर्यायी मार्गे कोल्हापूर गाठावे लागत आहे.

सिंधुदुर्ग वासियांची हीनार मोठी अडचण

प्रशासनाने हद्दी बंद करण्याऐवजी ठिकठिकाणी पोलिस चेक नाके तैनात करावेत. अशीही मागणी प्रवासी व वाहनचालकांकडून केली जात आहे. जगभरात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. लाखो लोक या रोगाने संक्रमित झाले आहेत. तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. प्रशासनाला घाटमार्ग बंद करुन प्रत्यक्षात काय साध्य करायचे आहे? असा संतप्त सवाल प्रवाशांमधून केला जात आहे. तसेच आजारी रुग्ण असेल तर त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूर व अन्यत्र ठिकाणी घेऊन जाण्यासाठी करुळ घाट मार्गाचा अवलंब करावा लागतो. त्यातूनच रुग्ण दगावला तर त्याला जबाबदार कोण? भुईबावडा परिसरातील लोकांना हा घाट जवळचा आहे. भुईबावडा घाट बंद झाल्याने करुळ घाटमार्गे जाण्यासाठी ४० कि. मी. अंतर पार करावे लागणार आहे.

कोकणातील जनतेसाठी हितावह निर्णय

दरम्यान कोरोनाचा वाढत प्रभाव पाहता कोल्हापूर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भुईबावडा गावचे सरपंच बाजीराव मोरे यांनी केले आहे. कोल्हापूरचे अनेक लोक या घाटाने जिल्ह्यात येत असतात त्यांच्या माध्यमातून होणारे संक्रमण रोखायचे असेल तर आपल्याला हा निर्णय घ्यावाच लागेल असे ते म्हणाले. तर हा घाट अजून १० दिवस तरी बंद रहावा असेही ते यावेळी म्हणाले. हा घाट मार्ग बंद करणे हे कोकणातील जनतेसाठी हितावह आहे. आमच्या गावठी रूगन वाढत आहेत त्यामुळे हा निर्णय हितावह असल्याचे ते म्हणाले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img