‘बिपरजॉय’ चक्रीवादळामुळे कोकणाती तिन्ही जिल्ह्यात ‘अलर्ट’

0
217

कोकण – अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘बिपरजॉय’ चक्रीवादळ अतितीव्र ऊप धारण करण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. समुद्राजवळून ४०-५० कि.मी. तर कमाल ५५ ते ६० कि.मी. प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. तरी या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. जोरदार पाऊस तसेच समुद्रही खवळलेला राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘अलर्ट’ जाहीर केला असून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्वसूचनांनुसार, अरबी समुद्रात ‘बिपरजॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळेसमुद्र खवळलेला राहणार आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने या कालावधीत मच्छीमारांना समुद्रात न जाण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच मासेमारीसाठी समुद्रात गेलेल्यांनी तत्काळ समुद्रकिनारी परतावे, अशा स्वऊपाच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगाल उपसागरातील मोचा चक्रीवादळ आल्यानंतर नवीन वर्षातील दुसरे व अरबी समुद्रातील पहिले वादळ बिपरजाय सक्रिय झाले आहे. या अनुषंगाने या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार असून समुद्रकिनारी वेगाने वारे वाहणार आहेत. त्यासाठी नागरिक तसेच पर्यटकांनी समुद्रकिनारी (समुद्र चौपाटी) येथे जाणे टाळावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.

वादळ काळात जोरदार पावसाची शक्यता

प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी जिह्यात पर्जन्यमान व वाऱ्याच्या वेगाविषयक प्राप्त माहितीनुसार, जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा (वाऱ्याचा वेग ३०-४० कि.मी. प्रती तास) व विजांच्या कडकडाटासह पर्जन्यमान होण्याची शक्यता आहे.

जिल्हा प्रशासनाकडून संपर्क क्रमांक जारी

वादळाचा प्रभाव जिह्यात जाणवणार असल्याने कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी नागरिकांसाठी प्रशासनाने क्रमांक जारी केले आहेत. तसेच कोकणातल्या जिह्यातील तब्बल १५ तालुक्यांमध्ये तालुका नियंत्रण कक्ष कार्यरत असून त्यांचे देखील संपर्क क्रमांक जारी करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here