26 C
Panjim
Thursday, August 11, 2022

बंद पडणाऱ्या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देऊ नका- मनसे प्रदेश सरचिटणीस माजी आमदारपरशुराम उपरकर ठाकरेबद्दल राणेंना बोलण्याचा अधिकार नाही

spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – अख्या जगावर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुहृदयसम्राट नाव कोरले आहे. त्यांचे नाव खासगी विमानतळ प्रकल्प असलेल्या चिपी विमानतळाला देऊ नये. त्या ऐवजी मुबंई गोवा राष्टीय महामार्ग होत आहे,त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे,ही मागणी मनसेची आहे. मी आजही बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक आहे. आता हे उपरे सत्ताधारी व विरोधका विमानतळ नामांतर श्रेयवाद करत असल्याची टीका मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी केली.

कणकवली मनसे संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत आहे. यावेळी उपजिल्हाध्यक्ष दया मेस्त्री, शैलेश नेरकर आदी उपस्थित होते.

राणेंनी शिवसेना संपविण्याची भाषा केली होती

राणे व त्यांच्या पुत्रांनी सात्यतांनी टीका बाळासाहेब ठाकरे यांच्यावर केली. शिवसेना संपविण्याची भाषा केली. त्यावेळी जिल्ह्यात आम्ही राणेंशी लढलो, आम्ही राहिलो नसतो तर आताची शिवसेना राहिली नसती. आता पुतण्या मावशीच्या प्रेमाप्रमाणे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा आग्रह करत आहे. राणेंनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना संपवण्यासाठी भाषा केली. त्यांच्या मोठ्या मुलाने बाळासाहेबांबद्दल काही वक्तव्य केल्याने महाराष्ट्राची राणेंना माफी मागावी लागली. राणे कुटुंबातील लोकांना बाळासाहेब ठाकरे यांच्या वर बोलायचा अधिकार नसल्याचे यावेळी परशुराम उपरकर म्हणाले.

सत्ताधारी आणि विरोधक नामांतरावरून श्रेय वाद करत आहे

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सत्ताधारी व विधानसभेतीळ विरोधी पक्ष नामांतरावरून श्रेय वाद करत आहे. हे विमानतळ किती दिवस चालेल? त्याला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देणं किती योग्य आहे? लातूर,नाशिक, कोल्हापूर ही विमानतळ या आधीच बंद पडली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांनी जनसामान्यांसाठी काम केले होते. त्यांच्याच स्वप्नातून झालेल्या मुबंई पुणे या मार्गाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले पाहिजे होते असे सांगतानाच मुंबई गोवा महामार्गाला आता बाळासाहेब यांचे नाव द्या अशी मागणी परशुराम उपरकर यांनी केली.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img