प्रांताधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सची आढावा बैठक संपन्न, शहरातील हॉटस्पॉटच्या अनुषंगाने आखण्यात आली रणनीती

0
123

सिंधुदुर्ग – कणकवली शहरातील 17 पैकी आठ प्रभागांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या सातपेक्षा अधिक आहे. या ठिकाणी प्राधान्याने टेस्टिंग सुरू करण्यात येणार आहे. तरी शहरातील त्या वॉर्डातील सर्व नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे, असे आवाहन प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी केले.

आपणाला कोरोनावर नियंत्रण आणावयाचे असल्याने टेस्टिंग, लसीकरण वाढवून रुग्ण संख्या कमी करण्याच्या दृष्टीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे, असे प्रांताधिकारी राजमाने यांनी सांगितले.

येथील तहसीलदार कार्यालयात वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली शहरातील हॉटस्पॉटच्या अनुषंगाने टास्क फोर्सची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी तहसीलदार रमेश पवार, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, नगरसेवक संजय कामतेकर, मेघा गांगण, कन्हैया पारकर, शिशिर परुळेकर, उर्मी जाधव, कविता राणे, विराज भोसले तसेच महेश सावंत, पोलीस निरीक्षक अमजुद्दिन मुल्ला, उपजिल्हा रुग्णालयाचे वैदयकीयअधीक्षक डॉ. शिकलगार, डॉ. चौगुले व नगरपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत शहरातील बाजारपेठ, शिवाजीनगर, मधलीवाडी, तेलीआळी, परबवाडी, टेंबवाडी, बिजलीनगर, विद्यानगर या आठ प्रभागांमध्ये कोरोना रुग्णसंख्या सर्वाधिक असल्याने हे वॉर्ड हॉटस्पॉट ठरले आहेत. या प्रभागांमध्ये अनुक्रमानुसार टेस्टिंग करण्यात येणार आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना टेस्टिंग करणे, तसेच 45 वर्षावरील लोकांनी लसीकरण करून घेणे यासाठी प्रवृत्त करावे, असे आवाहन प्रांताधिकारी राजमाने यांनी केले. याला सर्व लोकप्रतिनिधींनी सहमती दर्शवली. शहरातील टेस्टिंग साठी नगरपंचायत कर्मचारी व आरोग्य यंत्रणा यांच्या एकत्रितरित्यात दोन टीम करून त्यामार्फत कार्यवाही करण्यात येणार आहे.

आपणाला टप्पा 2 मध्ये जावयाचे असल्यास टेस्टिंग वाढवून, लसीकरण करून आढळणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांना विलगीकरण ठेवून, आवश्यक उपाययोजना तातडीने राबविणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करावेत, असेही आवाहन वैषाली राजमाने यांनी केले. शहरातील खाजगी डॉक्टर्सकडे येणार्‍या सर्दी, ताप आदी रुग्णांबाबतचा डाटा रोजच्या रोज घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नगरसेवकांनीही आपापल्या प्रभागातील डॉक्टरना तशा सूचना द्याव्यात, असे आवाहनही वैषाली राजमाने यांनी केले. त्यानुसार संबंधित डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना तातडीने सूचना देण्यात येतील, असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here