30 C
Panjim
Saturday, December 3, 2022

प्रसुतीच्या आदल्या दिवशीपर्यंत कर्तव्यावर कार्यरत

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

कणकवली तालुक्यातील कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आशा सेविकेचे कामही आदर्शवत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर श्रद्धा गावडे या आशा सेविकेने गरोदरपणातही घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम केले. अगदी नववा महिना सुरू असतानाही कामाला टाळाटाळ केली नाही. अगदी 12 एप्रिलपर्यंत तिने सर्व्हे केला. 13 एप्रिलला मात्र रुग्णालयात दाखल व्हावं लागलं अन् 14 रोजी तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. स्वत:पेक्षा कर्तव्य श्रेष्ठ मानणाऱया या रणरागिणीच्या कार्याला आणि धैर्यालाही लाख-लाख सलाम!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाचे काम गावपातळीवर जोरदार सुरू आहे. यात आरोग्य कर्मचाऱयांसह सर्व्हे व इतर माहिती गोळा करण्याचे काम करतात, त्या आशा सेविका व अंगणवाडी सेविका. मानधन तत्वावर काम करणाऱया या आशा, अंगणवाडीताई कोणतीही तक्रार न करता, आपले काम चोखपणे बजावत आहेत.

अशाचप्रकारे कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करणाऱया आशा सेविका सौ. श्रद्धा सुनील गावडे यांचे कार्य सिंधुदुर्गमधील तमाम जनतेसमोर आदर्शवत असेच आहे. कळसुली प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत काम करणाही ही आशा सेविका गरोदर होती. नववा महिना लागताच कोरोनाचे संकट सिंधुदुर्गपर्यंत येऊन पोहोचले. साहजिकच आशा व अंगणवाडी ताईंना सर्व्हेचे काम देण्यात आले. या कालावधीत आरोग्य, महसूल, पोलिसांच्या सुट्टय़ाही रद्द करत त्यांना अत्यावश्यक कामासाठीचे आदेश दिले गेले. या कालावधीत या यंत्रणाही सक्षमपणे आपले काम करताना दिसतात. त्यांना गावपातळीवर तेवढय़ाच सक्षमपणे काम करणाऱयांपैकी आशासेविका श्रद्धा गावडे यांनीही आपली जबाबदारी तेवढय़ाच सक्षमपणे पार पडण्यास सुरुवात केली.

नवव्या महिन्यातही काम

नववा महिना सुरू असूनही कोणतीही तक्रार न करता त्यांनी घरोघरी पायी जात सर्व्हेचे काम केले. प्रचंड उष्म्यातही प्रामाणिकपणे सौ. गावडे यांनी कामगिरी चोख पार पाडली. त्यांच्या या कामाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ यांच्यासह सर्व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱयांनीही कौतूक केले. कोरोनापासून स्वत:च्या बचावासाठीची अत्यावश्यक काळजी घेत तिने केलेले काम खूपच उल्लेखनीय असल्याचे डॉ. पोळ यांनी सांगितले.

12 एप्रिलपर्यंत सौ. श्रद्धा गावडे या आपली कामगिरी चोखपणे पार पाडत होत्या. 13 रोजी त्या प्रसुतीसाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाल्या आणि 14 रोजी त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. ‘संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बेहत्तर…नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर’ या उक्तीप्रमाणे संकटाचा सामना करत आयुष्याला उत्तर देणाऱया या आशाताईच्या कर्तृत्वाला सलाम!

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles