प्रसिद्ध अभिनेते महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी; एकास खेड मधून अटक

0
100

रत्नागिरी – प्रसिद्ध अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्याकडे खंडणीची मागणी करण्यात आली आहे. अंडरवर्ल्डच्या नावे महेश मांजरेकर यांच्याकडे ३५ कोटी रुपये मागितल्याची माहिती आहे. या प्रकरणी एका युवकास रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातून मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या युवकाचे कनेक्शन कुख्यात अंडरवल्ड दोन अबू सालेम याच्याशी आहेत का याचाही तपास केला जाणार आल्याची माहिती पुढं येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार अबू सालेमच्या टोळीतील एकाकडून ही धमकी देण्यात आल्याचे कळते. धमकीनंतर महेश मांजरेकर यांनी दादर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. मांजरेकर यांच्या मोबाईलवर मेसेज पाठवून खंडणी मागितल्याची आल्याची माहिती सूत्रांनी दिली. अबू सालेम टोळीकडून धमकी देण्यात आली होती. या प्रकरणी मुंबईतील दादर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी रत्नागिरीतील खेड येथून ३२ वर्षाच्या युवकाला काल ताब्यात घेतले आहे. त्याचा अबू सालेमशी संबंध आहे का याचा तपास केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here