26 C
Panjim
Monday, August 15, 2022

पीएमसी बँक,खंबाटा घोटाळ्या प्रमाणेच संचयनी घोटाळ्यात सुद्धा शिवसेनेचे नेते आमदार नितेश राणे यांचा आरोप

spot_img
spot_img

 

सिंधुदुर्ग – पीएमसी बँक घोटाळ्यात सामान्य जनतेचे पैसे अडकले आहेत.या घोटाळ्यात शिवसेनेच्या नेतेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होत होतात.खंबाटा मधील कामगारांचे पैसे खाण्याचा आरोप येथील स्थानिक खासदार विनायक राऊत जे शिवसेनेचे आहेत यांच्यावर होतो. तसाच हा संचयनी घोटाळा आहे.यात शिवसेनेच्या नेत्यांची नावे आहेत.कोकणी जनतेने ज्या विश्वासाने पैसे गुंतवलेले त्यांचे आजपर्यंत पैसे परत भेटलेले नाहीत. आजही संचयनीतील आरोपी फरार दाखविले आहेत त्यांच्यावर कारवाई झालेली नाही. संचयणीत फसवणूक केलेल्याना अटक व्हावी आणि जनतेचे पैसे लवकरात लवकर मिळावेत अशी आपली मागणी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी कणकवली येथे पत्रकार परिषदेत एका विचारलेल्या प्रश्नला उत्तर देताना सांगितले.

संचयनीत सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक

संचयनीत सिंधुदुर्ग जिल्हातील जनतेची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केली आहे.पीएमसी बँक घोटाळा, खंबाटा घोटाळा या प्रमाणेच संचयनी चाही घोटाळा आहे. या बाबत मला राजकीय आरोप करायचे नाहीत. परंतु या घोटाळ्यात शिवसेनेचेच पुढारी गुंतले आहेत हे सर्वज्ञात आहे. संचयनी घोटाळ्याची तक्रार ठेवीदारांनी जशी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे साहेब यांच्या कडे केली तशीच माहिती देशाचे प्रधानमंत्री आणि अर्थ मंत्र्यांना पत्रपाठवून दिली आहे. त्यानुसार केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुरागजी ठाकूर यांनी कारवाईचे आदेश आणि आरोपीना अटक करण्याचे आदेश दिले आहे.

स्पेशल ऑफिसर नियुक्त

संचयनीतील ज्या गुंतवणूकदारांची फावणूक झाली आहे त्यांना पैसे परत करण्यासाठी स्पेशल ऑफिसर नियुक्त केलेला आहे.वर्षानुवर्षे पैसे अडकून असलेल्या लोकांना त्यांची परत फेड केली जावी एवढीच स्थानिक आमदार म्हणून माझी अपेक्षा आहे. संचयनी कोण चालवत होते हे जगजाहीर आहे. हे शिवसेनेचेच लोक चालवत होते.त्यामुळे या घोटाळ्यातील पैसा जनतेला लवकरात लवकर मिळावा ही राणे साहेबांची भूमिका आहे.यात दोषी असतील त्यांची नावे चौकशीत बाहेर निश्चितच येतील.त्यामुळे राजकीय आरोप आपल्याला करायचे नाहीत असे ही आमदार नितेश राणे यांनी सांगितले.

triumph-high school-ad
- Advertisement -spot_img
spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player
YouTube player

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -spot_img