पणजी आज अवतरणार माशांची दुनिया

0
220


साग मैदानावर एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलचे आयोजन
पणजी:मत्स्योद्योग संचालनालयाच्या वतीने येथील साग मैदानावर 13 ते 15 फेब्रूवारी दरम्यान एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.आज सायंकाळी सात वाजता मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि मत्स्योद्योग मंत्री फिलिप नेरी यांच्या प्रमुख उपस्थितीत या फेस्टिव्हलचे उद्धाटन केले जाणार आहे.


फेस्टिव्हलसाठी पर्यावरण पूरक साहित्य वापरुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे.समुद्र आणि त्यातील मासे कलात्मक पद्धतीने मांडून प्रवेशद्वार बनवण्यात आले आहे.प्रवेशद्वारातून आत जाताच दोन्ही बाजूला गोव्यातील मच्छीमार आणि मासळी बाजार दर्शवणारी चित्रे चित्रकारांनी साकारली आहेत.काही चित्रांना मारिया मिरांडा यांच्या शैलीत सादर करण्यात आले आहे.


या फेस्टिव्हलमध्ये आकर्षक मासे पहायला मिळणार आहेत.त्यासाठी आकर्षक मांडणी करण्यात आली आहे.एक्वेरियममध्ये जाताना पायाखाली,डोक्यावर आणि आजूबाजूला काचेच्या पेटयांमधील मासे आपली भेट यादगार केल्या शिवाय राहणार नाहीत.
मासे आणि सांगित हा गोमंतकीयांचा वीक पॉइंट आहे.त्याची चव चाखण्याची व्यवस्था येथे असणार आहे.विविध विषयावर चर्चासत्रे देखील यानिमित्त आयोजित करण्यात आली असून सकाळी 10 पासून रात्री 10 पर्यंत हा फेस्टिव्हल लोकांसाठी खुला असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here