पक्षीय पादत्राणे बाजूला ठेवून सिंधुदुर्ग पर्यटन महासंघाच्या संकल्पनेला सहकार्य करूया – आमदार दीपक केसरकर

0
97

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील नैसर्गिक संपदा,जैवविविधता,कला, संस्कृती आणि परंपरा ही जगासमोर आणण्यासाठी आणि शाश्वत विकास व त्यातून रोजगार निर्माण करण्याची सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटन व्यवसायिक महासंघाची चळवळ कौतुकास्पद आहे.

 

त्यासाठी पक्षीय पादञाणे बाजुला ठेवून महासंघाच्या या संकल्पनेला सर्वानीच सहकार्य करूया, असे आवाहन आमदार दिपक केसरकर यांनी केले.

 

पर्यटन संचनालय व सिंधुदुर्ग जिल्हा व्यवसायिक महासंघाच्या सयुक्त विद्यमाने आज सावंतवाडी तालुक्यातील पर्यटन व्यवसायिकांची कार्यशाळा डि. के. टुरिझम माजगाव येथे संपन्न झाली. या कार्यशाळच्या उदघाटनपर संबोधनात केसरकर बोलत होते.

 

यावेळी उपस्थित असलेले पर्यटन संचनालयाचे उपसंचालक श्री हनुमंत हेडे यांनी पर्यटन संचालनालयाच्या वतीने पर्यटन व्यवसायिकाना शासनाच्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. कार्यशाळेत सावंतवाडी तालुक्यातील सुमारे पन्नासहून जास्त व्यवसायिकानी सहभाग घेतला.

 

निसर्ग पर्यटनाबाबत श्री संजय नाईक यांनी सविस्तर माहिती दिली तसेच पर्यटन व्यावसायिकांच्या विविध अडचणीबाबत श्री मनोज हाडवळे यांनी मार्गदर्शन केले.

 

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महासंघाचे जिल्हा सचिव अॅड. नकुल पार्सेकर यांनी महासंघाची भुमिका आणि भविष्यातील कृती आराखडा मांडला. आभार महासंघाचे कार्याध्यक्ष श्री सतीश पाटणकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here