न्यायमूर्ती संदिप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती 11 डिसेंबरला सिंधुदुर्गात जिल्ह्यातील अभिलेख पडताळणीचे काम युद्धपातळीवर नागरिकांनी उपलब्ध पुरावे 24 नोव्हेंबरपर्यंत विशेष कक्षात सादर करावेत

0
105

 

सिंधुदुर्ग : मराठा आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्र मध्ये गंभीर बनत चाललेला आहे.त्यामुळे जिल्हा पातळीवर मराठा-कुणबी नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
राज्यातील मराठा समाजातील व्यक्तींना मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात संबंधित व्यक्तींनी सक्षम प्राधिकारी यांचेकडे कुणबी जातीसंदर्भात सा केलेल्या निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसुली पुरावे, निजामकाळात झालेले करार, राष्ट्रीय दस्ताऐवज इत्यादी पुराव्यांची वैधानिक व प्रशासकीय तपासणी कशी करावी व तपासणी अंती मराठा-कुणबी, कुणबी- मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपद्धती विहित करणेसाठी न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभिलेख पडताळणीचे काम युद्धपातळीवर सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे. या कामाचा आढावा घेण्यासाठी दिनांक 11डिसेंबर 2023 रोजी न्यायमुर्ती संदिप शिंदे (निवृत्त) यांचे अध्यक्षतेखालील समिती या कार्यालयात येणार असून दिनांक 11 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 10.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे सदरची आढावा सभा होणार आहे. याकामी न्यायमूर्ती संदीप शिंदे(निवृत्ती)समितीने आरक्षणासाठी जिल्ह्यातील नागरिकांकडून पुरावे समिती कामकाजाकरिता स्विकारण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की, जिल्ह्यातील नागरीकांनी त्यांच्याकडील उपलब्ध असलेले पुरावे, वंशावळी, शैक्षणिक व महसुली पुरावे, संस्थानिकांनी दिलेल्या सनदा राष्ट्रीय दस्ताऐवज, इ.जुनी अभिलेख या कार्यालयातील विशेष कक्षात (सामान्य शाखेत) दिनांक 21 ते 24नोव्हेंबर 2023 या कालावधीत सादर करावेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here