नॅशनल पॉवरलिफ्टींग स्पर्धेत सिंधुदुर्गचे सोनेरी यश ४ सुवर्ण पदकांसह ६ रौप्य व ३ ब्राँझ पदकांची कमाई : संजय साटम ला दुहेरी सुवर्ण पदक

0
71

 

सिंधुदुर्ग – इंडियन पॉवर लिफ्टींग फेडरेशनच्या मान्यतेने, नॅशनल पाॅवरलिफ्टींग चॅम्पयिनशिप स्पर्धेत, महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्हा पाँवर लिफ्टींग असोसिएशन अंतर्गत, राष्ट्रीय स्पर्धेत सिंधुदुर्ग मधून उतरलेल्या १० खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली आहे.

या स्पर्धकांनी ४ सुवर्ण पदकांसह ६ रौप्य व ३ ब्राँझ पदके पटकाविली. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

हैद्राबाद येथे नॅशनल चॅम्पयिनशिप पाॅवरलिफ्टींग स्पर्धा १७ ते २० नोव्हेंबरला तेलंगणा व हैद्राबाद पाॅवरलिफ्टींग असोसिएशन यांनी संयुक्तपणे आयोजित केली होती. ही स्पर्धा सब ज्युनियर व ज्युनियर आणि मास्टर या वजनी गटात घेण्यात आली.

या स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे संजय पुंडलिक साटम (मास्टरगट ९३ किलो वजनी गट ) यांनी इक्विप व अनइक्विप गटातील दुहेरी सुवर्ण पदक मिळवून महाराष्ट्र व सिंधुदुर्ग जिल्ह्याला सोनेरी सुयश मिळवून देत यशाची परंपरा कायम ठेवली.

समर्थ प्रफुल्ल भावे ( सब ज्युनियरगट ९३ किलो वजनी गट ) इक्विप सुवर्ण पदक व अन इक्विप रौप्यपदक, सायली महेश घारे (ज्युनियर ५७ किलो वजनी गट )अन इक्विप सुवर्ण पदक व इक्विप ब्राँझ पदक, सृष्टि सुधाकर राणे ( ज्युनिअर ४७ किलो वजनी गट)

अन इक्विप रौप्यपदक व इक्विप रौप्य पदक, प्रसन्ना प्रदीप परब (सब ज्युनियर ५७ किलो वजनी गट ) अन इक्विप रौप्यपदक व इक्विप ब्राँझ पदक, हर्षदा आत्माराम ठाकर (सबज्युनियर ६३ किलो वजनी गट ) अन इक्विप ब्राँझपदक व इक्विप रौप्य पदक, सायली सखाराम सावंत (सबज्युनियर ४७ किलो वजनी गट)

अन इक्विप रौप्यपदक पटकाविले. तसेच साहिल आनंद मोर्ये ( ५९ किलो वजनी गट), श्रीराज मंगेश भडसाले (६६ किलो वजनी गट), ऋषिकेश सचिन तेली (८३ किलो वजनी गट) हे सबज्युनिअर गटात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here