सिंधुदुर्ग – संतोष परब हल्लाप्रकरणी दोन दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या आम. नितेश राणे यांना कोर्टात हजर करण्यात आले आहे. दोन दिवसांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने पुढील प्रक्रियेसाठी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले आहे. सरकारी पक्षाकडून नितेश राणे यांच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली जाणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर या मागणीला नितेश राणेंचे वकील जोरदार युक्तिवाद करून न्यायालयीन कोठडीची मागणी करतील, अशी शक्यता आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकूण घेतल्यानंतर न्यायालय नितेश राणेंना वाढीव पोलीस कोठडी देणार की न्यायालयीन कोठडी सुनावणार? याचा निर्णय काहीच वेळात होणार आहे.
आमदार नितेश राणे यांच्या वतीने सतीश मानेशिंदे हे न्यायालयात युक्तिवाद करत आहेत. पोलिसांच्या वतीने नितेश राणे यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली आहे. सहकारी पक्षांच्या वतीने ज्येष्ठ वकील प्रदीप घरत हे युक्तिवाद करणार आहेत.