“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर चिकटवत आमदार नितेश राणे यांची मोहीम सुरू गाड्या आणि मोटरसायकलवर चिकवले धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्टिकर

0
188

सिंधुदुर्ग-“धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज अशा आशयाचे स्टिकर गाड्या आणि मोटरसायकलवर लावून भारतीय जनता पार्टीचे आमदार नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली पासून मोहीम सुरू केली. या मोहिमेत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते,पदाधिकारी आणि शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. ओमगणेश निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावर मोटरसायकलच्या रॅली लावून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर आमदार नितेश राणे यांनी चिकटवून मोहिमेला सुरवात केली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय ..! जय भवानी जय शिवाजी..!अशा घोषणा देत आसमंत दुमदुमून सोडला.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून आम्ही पण तयार आहोत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय..! अशी घोषणा काल रात्री केली होती. आज ७ जानेवारी सकाळी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत “धर्मवीर” छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर प्रत्येक गाडीवर चिकटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली.यावेळी भाजपचे तालुका अध्यक्ष मिलिंद मिस्त्री,संतोष कानडे, जिल्हा प्रवक्ते भालचंद्र साटम, मनोज रावराणे, दिलीप तळेकर, पप्पू पुजारे, सरपंच संदीप मेस्त्री, महेश गुरव, साकेडी उपसरपंच प्रज्वल वर्दंम,गणेश तळेगावकर,मिलिंद चिंदरकर, विश्वनाथ जाधव, शिवा राणे, गोविंद घाडी, अभय गावकर, आधी सह भाजपचे असंख्य कार्यकर्ते,पदाधिकारी उपस्थित होते.मोटरसायकलला धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे स्टिकर चिकवलेल्या गाड्या ची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत कार्यकर्त्यांनी आणली.यात आमदार नितेश राणे सुद्धा सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here