31 C
Panjim
Saturday, December 3, 2022

दोन वर्षे प्रलंबित असलेल्या महामार्ग चौपदरीकरणाच्या निवाडयाना मंजुरी

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

 

सिंधुदुर्ग – महामार्ग चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण होऊन देखील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत बाधित होणाऱ्या जमीन मालकांना जमिनीचा किंवा चौपदरीकरणात बाधित होणाऱ्या बांधकामांचा मोबदला मिळाला नव्हता. असे कणकवली प्रांताधिकाऱ्यांमार्फत पाठवलेले 26 मिसिंग प्लॉट, बांधकाम चे निवाडे केंद्र शासन स्तरावर प्रलंबित होते. राज्यातले असे निवाडे मंजुरी च्या प्रतीक्षेत होते. अखेर कणकवली प्रांत कार्यालया मार्फत पाठवलेल्या 26 पैकी 21 निवाड्याना केंद्रा कडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गाला आपली जमिनी, बांधकामे बाधित होऊन देखील मोबदल्यात पासून वंचित राहिलेल्या जमीन मालकांना आता त्यांच्या जमिनीचा मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 21 जानेवारी रोजी या पुरवणी निवाड्याच्या अंतिम मंजुरी चे आदेश पारित करण्यात आले आहेत.

त्यानंतर आता यासंदर्भात प्रांताधिकारी तथा महामार्ग चौपदरीकरणाचे भूसंपादन अधिकारी (काला) कार्यालयामार्फत या संबंधित खातेदारांना मंजूर निवाड्यानुसार मोबदला वाटप करण्या बाबत नोटिसा बजावणी ची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. अशी माहिती सूत्रांनी दिली. त्या- त्या गावा मधील बाधित जमीनमालकांना तलाठ्याच्या मार्फत नोटीस ची बजावणी करण्यात येत आहे असेही सूत्रांकडून सांगण्यात आले. भूमीराशी पोर्टल द्वारे याबाबत अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नोटिसा प्रांताधिकारी कार्यालयात जमा केल्यावर त्या रत्नागिरी येथील हायवे च्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात येणार आहेत. व त्यांच्याकडून त्या केंद्र शासनाकडे जमा केल्यानंतर pfms प्रणाली द्वारे थेट संबंधित खातेदारांच्या खात्यावर मोबदल्याची रक्कम जमा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

2020 व 2021 या दोन वर्षाच्या कालावधीत कणकवली प्रांताधिकारी यांच्या मार्फत हे पुरवणी निवाडे महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यकारी अभियंत्याकडे पाठविण्यात आले होते. अनेक जमीनमालकांना त्यांच्या जमिनीचा किंवा चौपदरीकरण आत बाधित होणाऱ्या घरांचा मोबदला मिळाला नसल्याने महामार्गावर काही ठिकाणी चौपदरीकरणाचे काम अर्धवट व अपुऱ्या स्थितीत राहिले आहे. त्यातच या जमीनमालकांना देखील प्रशासन पातळीवर हेलपाटे मारावे लागल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला होता. उर्वरित मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेले 5 निवाडे देखील लवकरच मंजुरी मिळेल अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. ह्या पुरवणी निवाड्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पाठवलेल्या निवाड्या मधील 3.53.00 हेक्तर, आर क्षेत्राचे एकूण 16 पुरवणी निवडे पाठवले होते.

त्यातील 14 पुरवणी निवाड्याना मंजुरी देण्यात आली. यामध्ये गाव निहाय मंजुरी मिळालेल्या निवाड्यानुसार मोबदला रक्कम पुढील प्रमाणे, असलदे गावातील 8,56,226, हुंबरट 1,70,588, जांभळगाव 15,55,387, जानवली 28,78,123, नांदगाव 23,77,665,
नागसावंतवाडी 16,79,143, उत्तर – दक्षिण गावठण 1,42,704, संभाजीनगर 23,0453, वारगाव 75,49, 409, खारेपाटण 31,71,829, तरळे 56,83,662, ओसरगाव 1,19,07,515, वागदे 6,93,00921, नडगीवे 8, 88, 95, 900 पहिल्या टप्प्यातील 14 पुरवणी निवाडे मंजूर करण्यात आले आहेत. तर त्यानंतर 0.60.00 हेक्टर, आर. क्षेत्राचे पाठवलेले 6 पुरवणी निवाडे देखील मंजूर झाले आहेत. यामध्ये, आनंदनगर 19,48,552, हुंबरट 23,98,287, जाभाळगाव 7,40,999, जानवली 6,03, 453, वारगाव 74,30,809, तर नांदगाव मधील 73,97,726 या 6 पुरवणी निवाड्याना देखील केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. तसेच आनंदनगर मध्ये मिसींग अतिरिक्त बांधकाम च्या 11,85,151 या देखील निवाड्याला मंजुरी दिल्याने गेली अडीच वर्षांपासून अधिक काळ रखडलेला महामार्गाच्या जमीन मालकांच्या मोबदल्याचा प्रश्न आता जवळपास मार्गी लागणार आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles