दारिस्तेतील स्वप्नालीच्या जिद्दीला आम्ही कणकवलीकरांचा सलाम, बक्षीस म्हणून दिला लॅपटॉप भेट

0
121

सिंधुदुर्ग – कणकवली तालुक्यातील दुर्गम अशा दारिस्ते गावातील स्वप्नाली सुतार आणि तिचे डोंगर पठारावरील ऑनलाईन शिक्षण संपादन करण्याचे अथक प्रयत्न प्रसिद्धी माध्यमातून जनसामान्यांसमोर आले. त्यानंतर तिच्या जिद्दीला सलाम करतानाच तिला आशीर्वाद देण्यासाठी “आम्ही कणकवलीकर ” परिवार सरसावला. या परिवाराकडून एक लॅपटॉप तिला तिच्या जिद्दीचे बक्षीस म्हणून सुपूर्द करण्यात आला आहे . स्वप्नालीच्या ज्ञान संपादन करण्याचा अथक प्रयत्न हा दुर्गम भाग जगाच्या नकाशावर पोहोचवणार आहे . “आम्ही कणकवलीकर ” यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते अशोक करंबेळकर , डॉ. सुहास पावसकर , बाळू मेस्त्री , विजय गावकर , हनीफ पिरखान , डी. बी. तानवडे , संजय मालंडकर आणि ऋषिकेश कोरडे यांनी स्वप्नालीच्या जिद्दीला सलाम करीत लॅपटॉप तिच्याकडे सुपूर्द केला .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here