दापोली हर्णै राज्य मार्गावर भीषण अपघात

0
32330

 

दापोली हर्णै राज्य मार्गावर आसूद येथे रविवारी दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला आहे. ट्रक व मॅजिक प्रवासी रिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला असून चार जण दगावल्याचा अंदाज आहे. या भीषण अपघात काहीजण जखमी झाले आहेत तर चार जणांचा प्रवाशांचा मृत्यू झाला असून यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश असल्याचे वृत्त आहे. या अपघातात हर्णै येथील प्रवासी मॅजिक गाडीचालक बॉबी सारंग यांचाही मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मोठी खळबळ उडाली असून प्रथमदर्शनी ट्रक चालकाच्याच चुकीमुळे चार ते पाच जणांना जीव गमवावे आहेत.घटनास्थळी दापोली पोलीस दाखल झाले होते मोठी गर्दी आहे. सगळ्या जखमी प्रवाशांना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून प्राथमिक उपचारानंतर काही प्रवाशांना पुढील उपचार करता पाठवण्यात आले आहे. दापोली तालुक्यात राज्यमार्गावर असलेल्या आसूद जोशी आळी येथे हा भीषण अपघात झाला. दुपारी 3.30 सुमारास झाला अपघात या अपघातामध्ये चारजण जण मृत्यूमुखी पडले आहेत यामध्ये दोन मुलींसह दोन अन्यजणांचा सामावेश आहे. पाच जखमींवर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू झाले आहेत. काही जखमीना मुबंईत हलवण्यात आल्याची माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here