दर्जेदार गोमंतकीय खेळाडूंना डावलून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बाहेरच्यांना प्राधान्य का? आर.जी. चा राज्य सरकारला संतप्त सवाल

0
226

 

राज्यात ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेची सुरुवात कालपासून झालेली आहे. कित्येक वर्षांनंतर राज्याला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले असून सुद्धा ह्या स्पर्धेत गोमंतकीय खेळाडूंना प्राधान्य दिले नाही. याचा निषेध करण्यासाठी व सरकारला जाब विचारण्यासाठी काल गुरुवारी पणजी येथे आर.जी. कडून पत्रकार परिषद बोलावण्यात आली होती. यावेळी आर.जी. चे युथ अध्यक्ष अशलोन रोड्रिगिस व उत्तर गोव्याचे आर.जी.पी सहसचिव लिसिओ रंकाँन उपस्थित होते.

या पत्रकार परिषदे दरम्यान अश्लोन यांनी राज्य सरकारवर टीका करताना म्हटले की राज्यात आज चारशे एकुणसत्तर कोटी तेवीस लाख रुपये खर्च करून ह्या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले , परंतु राज्यातील खेळाडूंना या स्पर्देपासून लांब ठेवण्यात आले. त्यांना प्राधान्य दिले गेले नाही. त्यांच्यावर अन्याय केला गेला. आज इतक्या वर्षानंतर राज्यात ह्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन होत असताना, राज्यातील खेळाडूंना वळगुन बाहेरच्या खेळाडूंना का प्राधान्य देण्यात आले? का क्रीडा स्पर्धेचे नियम बदलून ७०%स्थानिक व ३०%परराज्यातील खेळाडू खेळविण्याचा करण्यात आला? असा संतप्त सवाल अश्र्लोन रोड्रिगीस यांनी यावेळी केला.

यावेळी लीसिओ रंकाँन यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत तसेच क्रीडामंत्री गोविंद गावडे याणाच राज्यातील खेळाडूवर हा अन्याय केल्याचा आरोप केला. आज क्रीडामंत्री तसेच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील क्रीडा क्षेत्राला गंभीरतेने पाहिले नाही. याआधी बाबू आजगावकर, आणि आता गोविंद गावडे ह्या दोघांनीही क्रीडा क्षेत्रात आमूलाग्र बदल आणण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. खेळाडूंच्या विकासासाठी त्यांना कोच, क्रीडा साहित्य, मैदानं व्यवस्थित देता आले नाही आणि ह्यामुळेच आज राज्यातील खेळाडू वर्ग मागे पडला असून राज्य सरकारच याला जबाबदार असल्याचे लिसीओ रंकाँन म्हणाले.

गेल्या पावसाळी अधिवेशनात आर.जी. पक्षाचे एकमेव आमदार विरेश बोरकर यांनी क्रीडा क्षेत्रांसंबंधी अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारला जाब विचारला होता. सरकारची अकार्यक्षमता त्यांनी त्यावेळी दाखविली होती. बोरकर यांनी राज्यात किती क्रीडा स्पर्धांचे आयोजन मैदानावर होत असल्याचे विचारलेल्या प्रश्नावर, सरकारकडून मैदानावर स्पर्धांचे आयोजन सोडून, प्रदर्शन तसेच विक्री मेळाव्याचे आयोजन जास्त प्रमाणात होत असल्याचे उत्तर देण्यात आले होते. जर हे डबल इंजिन सरकार मैदानावर खेळाडू घडविण्याऐवजी वस्तू प्रदर्शने व मेळावे व इतर कार्यक्रम आयोजित करायला लागले तर, राज्यातील खेळाडूंची व क्रीडा क्षेत्राची किती बिकट आणि भयानक परिस्थिती असेल हे यावरून दिसून येत असल्याचेही रंकाँन म्हणाले.

जवळजवळ ४६९,२३००००० कोटी रुपये खर्चून आज राज्य सरकारला १००% खेळांचे आयोजन गोव्यात करता आले नाही., ही दुर्दैवाची गोष्ट असून राज्य सरकार , क्रीडा मंत्री गोविंद गावडे राज्यातील खेळाडूंना प्राधान्य देण्यात अपयशी ठरले आहे. आज राज्यात जिमनॅस्टिक, बॉक्सिंग सारख्या खेळात अनेक दर्जेदार खेळाडू असूनसुद्धा बाहेरचे खेळाडू घेण्यात आले आहेत. राज्यातील खेळाडू हे अशा स्पर्धेचे आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु सरकाराला त्यांची किंमत नाही, त्यामुळेच सरकारने स्वतःची ही अकार्यक्षमता लपविण्यासाठी हा ७०% ३०% चा फॉर्म्युला वापरला असल्याची टीका लिसीओ रंकाँन यांनी सरकारवर केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here