27.9 C
Panjim
Saturday, April 1, 2023

डॉ. साळकर यांनी मला जवळ घेतलं आणि जगण्याची उमेद दिली तोंडातला कॅन्सर आणि कोविड झालेले विठ्ठल मालवणकर यांनी सांगितला मणिपाल हॉस्पिटल मधला आपला अनुभव

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – तोंडात गाठ आली आणि उपचारासाठी मी २६ मार्चला मुंबईत खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. या ठिकाणी कॅन्सरची गाठ असल्याचे समजल्यानंतर माझ्यावर केमो थेरेपी करण्यात आली. मात्र त्यातून काही फारसा फरक जाणवला नाही. अखेर मी गोवा येथील मणिपाल हॉस्पिटल मध्ये दाखल झालो. या ठिकाणी मला मिळालेली वागणूक हि एका कुटुंबातील वागणुकीसारखी होती. येथील डॉ. साळकर यांनी मला जवळ घेतलं आणि जगण्याची उमेद दिली…. हे आपले अनुभव सांगत होते वेंगुर्ले येथील रहिवाशी, तोंडातला कॅन्सर आणि कोविड झालेले विठ्ठल मालवणकर.

मणिपाल हे गोव्यातील नामवंत हॉस्पिटल. या ठिकाणी तोंडातील कँसर आणि त्यात कोविड झालेल्या विठ्ठल मालवणकर यांच्यावर यशस्वी ऑपरेशन करण्यात आले. आता मालवणकर ठणठणीत बरे होऊन आपल्या वेंगुर्ले येथील घरी परतले आहेत. आज मी जो काही जिवंत आहे तो डॉ. साळकर यांच्यामुळे असे आवर्जून सांगतात.

आपण जेव्हा गोव्यात उपचारासाठी दाखल झालो त्यावेळी कोरोनाच्या देशभर पसरलेल्या संसर्गामुळे आपल्याला नियमानुसार अलगीकरणात ठेवण्यात आले. यात आपली कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. तोंडातील कॅन्सरची गाठ खुप वेदना देत होती. अशावेळी वेळीच उपचार होणे आवश्यक होते. माझा भाऊ संजय असाच कॅन्सरने गेला. त्यामुळे माझ्यासमोर त्याच अकाली जाण मला दिसत होत. माझ्या सर्वच कुटुंबाला संजयचा प्रसंग आपल्या घरात पुन्हा घडतोय कि काय असं वाटत होत. मी घाबरलो होतो. अशावेळी डॉ. साळकर भेटले. त्यांनी मला जवळ घेतलं. माझ्याशी बोलले. त्यांच्या आधाराने मला जगण्याची उमेद मिळाली. उपचारा आधी माझ्या नव्या आयुष्याच्या आशा पल्लवित झाल्या. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल. मी तयार झालो. अगदी यशस्वीपणे ऑपरेशन झालं. कोरोनामुळे अलगीकरणात रहावं लागलं म्हणून सुरवातीचे काही दिवस फुकट गेले. मात्र मी आज बरा होऊन घरी परतलो आहे. मालवणकर सांगत होते.

संजय मालवणकर हे विठ्ठल यांचे भाऊ. त्यांचं कॅन्सरने निधन झालं. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नामांकित पत्रकार होते.

मणिपालचा सर्व स्टाफ चांगला आहे. इथे एक शिस्त आहे. इथे येणाऱ्या रुग्णाला घरातल्या सारखी वागणूक मिळते. त्यामुळे जगण्याच्या आशा पल्लवित होतात. डॉ. साळकर हे नेहमीच रुग्नांची खूप काळजी घेतात त्याचा आत्मविश्वास वाढवतात. मी आधीच तिथे पोचलो पाहिजे होत. असे मालवणकर यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles