डेल्टा प्लसचा रुग्ण सापडलेल्या परिसरातील ६ इमारती प्रशासनाने केल्या सील

0
151

सिंधुदुर्ग – जिल्ह्यातील डेल्टा प्लसचा पहिला रुग्ण कणकवली शहरात सापडल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस व नगरपंचायत प्रशासन सतर्क झाले असून कणकवली परबवाडी येथील कामत सृष्टी परिसरातील 6 बिल्डिंग 14 दिवसांसाठी सील करण्यात आल्या असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांनी कामत सृष्टी येथे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. हा परिसर 14 दिवसांसाठी सील करत पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत माध्यमातून आपण सर्व त्या खबरदारीच्या उपाययोजना हाती घेतल्या असल्याचे सांगत कणकवली शहरात डेल्टा प्लसचा सापडलेला रुग्ण हा उपचारानंतर बरा झालेला आहे. तरी देखील त्या कॉम्प्लेक्समधील नागरिकांचे स्वॅब घेण्यात येत आहेत व कॉम्प्लेक्समधील प्रत्येक व्यक्तीचे थर्मल स्क्रीनिंग व ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यात येत असून नगरपंचायत सतर्कतेने काम करत असल्याचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here