26 C
Panjim
Thursday, January 27, 2022

जिल्ह्यात लॉकडाऊन, सावंतवाडी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त असूनही मोठी गर्दी

Latest Hub Encounter

 

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी संपूर्ण जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केले. २ ते जुलै या कालावधीत हे लॉकडाऊन राहणार आहे. मात्र याला सावंतवाडीकरांनी फारसा प्रतिसाद दिलेला नाही. या लॉकडाऊनचा सध्या सावंतवाडी शहरात फज्जा उडालेला दिसत आहे.

कणकवली शहर व परिसरात मोठ्या प्रमाणात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्याच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ जुलैपासून पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. यावेळी जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला. मात्र, असे असतानाही सावंतवाडी शहरात या लॉकडाऊनच्या दुसऱ्याच दिवशी लोकांचा मुक्तसंचार दिसून येत आहे.विशेष म्हणजे दुचाकी व अन्य गाड्यांना बंदी असतानाही सराईतपणे दुचाकीस्वार शहरात फिरताना दिसत आहेत. बाजारात तर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे. त्यामुळे लॉकडाऊन मध्ये शिथिलता आणली का असा सवाल आता नागरिक उपस्थित करीत आहेत. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी संघटनेने या सरसकट लॉकडाऊन ला विरोध करीत जिल्हा बंद पाळला. त्यावेळी मेडिकल वगळता अत्यावश्यक सेवेची सर्व दुकानेही बंद ठेवण्यात आली. मात्र दुसऱ्याच दिवशी अत्यावश्यक सेवेच्या दुकाने उघडल्यानंतर बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

- Advertisement -