सिंधुदुर्ग – जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस पडत आहे. त्यात महामार्गाचे काम सुरू असून ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे अशा अनेक ठिकाणी महामार्ग जलमय झाला आहे. कणकवली बेळणे येथे महामार्गावर अशाच साचलेल्या पाण्यात मंगळवारी रिक्षा स्लिप होऊन अपघात झाला होता. या अपघातातील गंभीर जखमी असलेले रिक्षा चालक संतोष आप्पाजी जेठे वय 50 यांचा यांचा आज कणकवली उपजिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गावर बेळणे येथील हॉटेल आशिष समोर रत्यावर आलेल्या पाण्यात रिक्षा स्लिप होऊन मंगळवारी दुपारी अपघात झाला होता, या अपघातात चालक संतोष आप्पाजी जेठे हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते.पहाटे त्यांची प्रकृती चिंताजनक झाली,अखेर आज त्यांचा मृत्यू झाला.
संतोष जेठे कणकवली तालुका पत्रकार संघाचे सदस्य होते.सामाजिक क्षेत्रात नेहमी अग्रेसर असायचे.रिक्षा व्यवसाय असल्याने नांदगाव पंचक्रोशीत त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्यांच्या निधनाची बातमी समताच नांदगाव बाजारपेठ बंद ठेवण्यात आली,तसेच रिक्षा संघटनेच्या वतीने बंद पाळण्यात आला. जेठे यांचा महामार्ग ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे बळी गेल्याची संतप्त भावना नांदगाव व असलदे वासीयांना यावेळी व्यक्त केली आहे.
दरम्यान पहिल्याच पावसात महामार्गाचे अत्यंत वाईट अवस्था ठिकठिकाणी झालेली पहायला मिळत आहे. बऱ्याच ठिकाणी भराव खचला आहे. तर गटार बांधणीची कामेही अत्यंत निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहेत.
फोटो
संतोष आप्पाजी जेठे, मृत रिक्षा व्यावसायिक