जिल्हा बँकेच्या नोटीसीनंतर “ती” इनोव्हा कार जिल्हा बँकेच्या दारात पराचा कावळा करू नका – जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत

0
190

सिंधुदुर्ग – जिल्हा बँकेने कर्जाचे हप्ते न फेडल्याने १०१ च्या नोटिसा बजावून गाड्या जप्तीचे आदेश दिल्याने जिल्ह्यात एकच खळबळ मांजली. कारण या जप्तीच्या प्रकरणात राणे समर्थकांनी २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत खरेदी केलेल्या १२ बोलेरो गाड्यांसह आमदार नितेश राणे वापरात असलेल्या इनोव्हा कारचा समावेश आहे. दरम्यान जिल्हा बँकेने एकूण ३०० जणांना १०१ ची नोटीस बजावली असून या गाड्यांवरून कोणीही पराचा कावळा करण्याची गरज नाही असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटले आहे.

जिल्हा बँकेच्या थकीत कर्जदारांवर बँकेची नेहमीच कारवाई सुरु असते. ज्यांचे २०१६ पासून थकीत कर्ज आहे त्यांचे आमच्या बँकेने सर्व सोपस्कार पूर्ण केल्यानंतर १०१ च्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. आपण म्हणतोना कि हातपाय पडले, बाबापुता केले, सगळे मार्ग अवलंबून झाले त्यानंतर १०१ ची कारवाई करावी लागते ती केलेली आहे. कुणाला तरी वाटेल कि सुडाने या १२ गाड्यांवर कारवाई केली आहे, तर ती १२ प्रकरण नाहीत कोणीतरी सांगेल आमच्याच १२ गाड्यांवर कारवाई केली म्हणून तर ३०० लोकांवर हि कारवाई करण्यात आली आहे. पराचा कावळा विरोधक करतील तर त्यांनी हे समजून घ्यावे कि १०१ ची कारवाई ३०० लोकांवर केलेली आहे. असेही ते म्हणाले सतीश सावंत यांनी जिल्हा बँकेच्या व्हिक्टर डांटस, विकास सावंत, विकास गावडे, आत्माराम ओटवणेकर, प्रज्ञा परब, प्रमोद धुरी आदी संचालकांच्या उपस्थित हि पत्रकार परिषद घेतली.

“ती” इनोव्हा जिल्हा बँकेसमोर

दरम्यान नोटीस बजावण्यात आल्यानंतर एम. एच. ०७ डब्ल्यू ००२३ हि गाडी जिल्हा बँकेसमोर उभी करण्यात आली आहे. हि इनोव्हा कार आमदार नितेश राणे ताफ्यात असली तरी हि गाडी त्यांच्या नावावर नाही. हि गाडी देवेंद्र सदानंद वणजू या रत्नागिरीतील व्यक्तीच्या नावावर आहे. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी या कारसाठी २२.३५ लाखाचे या कारसाठी वैयक्तिक थेट मध्यम मुदत बिगरशेती कर्ज घेण्यात आले होते. सध्या या कारचे १५ लाख ५६ हजार ५५९ रुपये ५० पैसे एवढी थकबाकी आहे. या कारला १५ ऑक्टोबर २०२० रोजी नोटीस बजावण्यात आली आहे. अशी माहिती यावेळी देण्यात आली. दरम्यान हि इनोव्हा कार जिल्हा बँकेसमोर आणून उभी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here