22 C
Panjim
Friday, January 27, 2023

जन आशीर्वाद यात्रेनंतर नारायण राणे दिल्लीला रवाना गोवा येथून जाणार दिल्लीला

- Advertisement -spot_img

सिंधुदुर्ग – केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम मंत्री नारायण राणे यांची कोकणातील जन आशीर्वाद यात्रेची सांगता रविवारी सिंधुदुर्ग झाली. त्यामुळे आज सकाळी साडेअकराच्या सुमारास राणे हे कणकवलीहुन गोवा एअरपोर्टच्या दिशेने रवाना झाले आहेत.

गोवा येथून जाणार दिल्लीला

आज दुपारी गोवा येथील विमातळावरून राणे दिल्ली येथे आपल्या मंत्रालयात जाणार आहेत. भाजपच्या जन आशीर्वाद यात्रेची सुरुवात १९ ऑगस्ट पासून मुंबई येथून झाली होती. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगड येथे जनतेशी संवाद साधत राणे आणि भाजपचे प्रमुख नेते रत्नागिरीत दाखल झाल्यानंतर एका वादग्रस्त विधानावरून नारायण राणे यांच्यावर राज्य शासनाने अटकेची कारवाई केल्यामुळे राणेची जन आशीर्वाद यात्रा देशभरात गाजली होती. त्यामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या जन आशीर्वाद यात्रेवर याचा काय परिणाम होणार याबाबत उत्सुकता होती. मात्र, राणेंच्या अटकेच्या कारवाई नंतरही भाजपने जन आशीर्वाद यात्रेचे योग्य असे नियोजन केले होते.

सिंधुदुर्गात शिवसेनेला डिवचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही

सिंधुदुर्गात नारायण राणे यांचे ठिक -ठिकाणी जंगी स्वागत झाले होते. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात मोठा फौजफाटा ही तैनान ठेवण्यात आला होता. भाजप जनआशीर्वाद यात्रेदरम्यान जिल्ह्यात राणेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा शिवसेनेला डिवचण्याचा फारसा प्रयत्न केला नाही. मात्र, यात्रेच्या समारोपाच्या दिवशी पत्रकार परिषदेतून राणे यांनी शिवसेनेच्या नेत्यांसह राष्ट्रवादी वरही घणाघात केला होता. राणे यांची जन आशीर्वाद यात्रा शेवटच्या टप्प्यामध्ये वेंगुर्ला दोडामार्ग या परिसरात होती. त्यानंतर कणकवलीत विश्रांती घेऊन राणे यांनी आज आपला दौरा संपवून दिल्लीला रवाना झालेत.

अलिबागच्या गुन्हे शाखेच्या हजर राहणार नाही

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विरोधात वादग्रस्त वक्तव्य झाल्यानंतर अटक आणि जामिनावर सुटका झाल्यानंतर नारायण राणे यांनी अलिबागच्या गुन्हे शाखेमध्ये भेट देणे अपेक्षित होते. पण नारायण राणे यांचे मेडिकल सर्टिफिकेट अलिबागच्या गुन्हे शाखेमध्ये पाठवले जाणार आहेत. नारायण राणे त्या ठिकाणी हजेरीला उपस्थित राहणार नसल्याचे समोर आले आहे.

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

Latest On Our Channel

YouTube player

Latest On Hub Encounter

YouTube player

Latest on Passay

YouTube player

Latest on Unsung hero

YouTube player
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles