कोकण रेल्वेच्या काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्या वेळेत बदल, रोहा आणि वीर मार्गावरील दुरुस्तीचे काम सुरू

0
47

सिंधुदुर्ग – सध्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कोकणात चाकरमानी येण्यास सुरुवात झाली आहे.

पण याच दरम्यान कोकण रेल्वे मार्गावरील रोहा आणि वीर स्थानकादरम्यान रेल्वेमार्गाच्या दुपदरीकरण काम हाती घेतल्याने आज तारीख ३० ऑगस्ट रोजीच्या कोकण रेल्वे मार्गावरील काही गाड्या रद्द तर काही गाड्यांच्याव वेळेत बदल करण्यात आला आहे.

मंडगाव ते मुंबई धावणारी मांडवी एक्सप्रेस, मंडगाव ते एलटीटी मंडगाव स्पेशल या गाड्यांचा समावेश आहे.

याबाबत कोकण रेल्वेने संकेतस्थळावर प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, वीर आणि रोहा विभागांमध्ये रेल्वे ट्रॅकचे दुपदरी करणाचे काम सुरू आहे.

त्यामुळे काही गाड्या रद्द करून तर काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. मुंबई ते मंडगाव क्र. ०१०८५ ही गाडी पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

तसेच गाडी क्र. ०१११३ मुंबई सीएसएमटी ते मंडगाव जंक्शन मांडवी एक्सप्रेस रद्द करण्यात आली आहे. तसेच मंडगावहून मुंबईकडे जाणारी ०१११४ ही अप मांडवी एक्सप्रेस ही आज रद्द करण्यात आली आहे.

मंडगाव जंक्शन ते एलटीटी ही विशेष गाडी ही रद्द करण्यात आली आहे. तसेच तसेच ०२४१३ मंडगाव ते निजामुद्दीन ही आज नियोजित वेळेपेक्षा तीन तास उशिराने धावणारा आहे.

गाडी क्रमांक ०११५२ मंडगाव जंक्शन ते सीएसटी जनशताब्दी एक्सप्रेस ही आज मंडगाव येथून दोन तास उशिराने सुटणार आहे.

मुंबई वरून येणाऱ्या प्रवाशांचे व कोकणातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होणार असल्याचे समजत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here