चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर होणार कारवाई – पालकमंत्री उदय सामंत

0
158

 

सिंधुदुर्ग – एक लाख पासेस मी दयायला सांगितले ही चुकीची माहिती आहे. संबंधित कोरोना बाधित मुलीने रितसर पास घेतला होता. ती आजोबांच्या अंतिम विधीसाठी आली होती. याबाबत कोणीही राजकारण करू नये. माझ्या गाडीतून चाकरमानी आलेत असा चुकीचा मेसेज पसरवला जातोय. मुंबईकरांमध्ये चुकीची माहिती दिली जातेय. जेव्हा मुंबईकरांना आणण्याबाबत शासनाचा निर्णय होईल, तेव्हाच मी निर्णय घेईन. सोशल मिडीयावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवर यापुढे पोलीस कडक कारवाई करतील असे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

कुडाळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ये पुढे म्हणाले आता केंद्र सरकारने परप्रांतीय मंजुरांना आणण्याचा निर्णय घेतला आहे. जे विद्यार्थी मुंबईत अडकलेत त्यांना चांगल्या दर्जाचे गेस्ट हाऊस दिले जाईल. हे सर्व विद्यार्थी व पालक माझ्या संपर्कात आहेत. शिवाय ३४ मुलींची यादी माझ्याकडे आली असून आमदार वैभव नाईक व संदेश पारकर यांनी यासाठी प्रयत्न केले आहेत. भविष्यात पासधारक जिल्ह्यात कसे कमी येतील ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे. जिल्ह्यात विकासकामे सुरू केली आहेत. या आणि अर्धवट कामांची यादी देण्याचे बांधकाम अभियंता यांना आदेश दिले आहेत. पाच सहा वर्ष एकच काम घेवून ती अर्धवट ठेवत असेल तर त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका असे आदेशही आपण दिल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. धनंजय चाकूरकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बॅकेचे चेअरमन सतीश सावंत, संदेश पारकर, अमरसेन सावंत, अतुल बंगे, संजय भोगटे, राजन नाईक, अवधुत मालणकर, नगरसेवक सचिन काळप आदी उपस्थिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here