महाविदयालयीन परीक्षा होणारच, तीन दिवसात जाहीर करणार वेळापत्रक  – उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

0
133

 

सिंधुदुर्ग – यूजीसी च्या गाईडलाईन नुसार येत्या २-३ दिवसात महाविद्यालयीन परीक्षा  आमचं खात जाहीर करेल. यूजीसीन एफ. वाय. व एस. वाय. च्या परीक्षा १ जुलै पासून १५ जुलै पर्यंत संपवाव्यात आणि १२  नंतरचे प्रवेश लवकरात लवकर करून १ सप्टेंबर पासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरवात करावी अशा गाईड लाईन दिलेल्या आहेत त्याप्रमाणे परीक्षेचे वेळापत्रक तयार केले जाईल. राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना हे वेळापत्रक दाखवून परीक्षा जाहीर केल्या जातील असे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

यूजीसी च्या महाराष्ट्र शासन आणि युनिव्हर्सिटीला दिलेल्या गाईडलाईनच्या पार्श्वभूमीवर आम्ही कुलगुरुंची समिती स्थापन केली आहे. त्याच्यामध्ये २ डायरेक्टर्स आहेत त्यांची बैठक उद्या व्हिडीओ कॉन्फरन्सने होईल तर पर्वा पुन्हा एकदा सगळ्या कुलगुरुंची व्हिडीओ कॉन्फरन्स आहे. त्याच्यामध्ये अंतिम निर्णय आणि वेळापत्रक आम्ही तयार करू. मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्या निदर्शनास ते वेळापत्रक आणून देऊ आणि त्याच्यानंतर परीक्षा घेण्याचा निर्णय येत्या दोन ते तीन दिवसात आम्ही जाहीर करू असे उच्चतंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. कुडाळ येथील एमआयडीसी विश्रामगृहावर ते बोलत होते. —

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here