सिंधुदुर्ग : चिपळूण येथे झालेला ठाकरे समर्थक व राणे समर्थक यांच्यात झालेला राडा म्हणजे भास्कर जाधव यांच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता आणि त्याला भाजपाची साथ असल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केलाय. निलेश राणे यांनी सभा घेताना गुहागर व चिपळूण येथील कार्यकर्त्यांना घेऊन करायला हवी होती मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुमारे 500 गाड्या गुहागरला गेल्या आहेत. ही सभा जाहीर झाल्यानंतरच निलेश राणे यांना सुरक्षा देण्यात आली होती. अशी दादागिरी शिवसेना खपवून घेणार नाही असा इशारा देखील नाईक यांनी यावेळी दिलाय.
दरम्यान,निलेश राणे यांच्या गाडीवर चिपळुणात भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे चिपळुणात जोरदार राडा झाला. राणे आणि जाधव यांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केला त्यामुळे चिपळूण शहरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वैभव नाईक यांच्या निवासस्थाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कणकवली पटवर्धन चौक व अन्य ठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप स्वतः पेट्रोलिंग कणकवली शहरात करीत आहेत.
भास्कर जाधव यांचा उद्धव ठाकरे यांच्या कणकवली दौऱ्याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यामुळे माजी खासदार निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्यावर टीका केली होती. त्यांचा समाचार घेण्यासाठी आपण त्यांच्या गुहागर मतदारसंघातच सभा घेऊ आणि तेथेच बोलू, असे त्यांनी जाहीर केले. त्यानुसार आज सायंकाळी 6 वाजता निलेश राणे आणि समर्थक आणि भाजपा नेते हे भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोरून रॅली काढत असताना भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी निलेश राणेंच्या ताप्यावर दगडफेक केली आणि त्यामुळेच चिपळूण शहरांमध्ये तणावपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे तसेच दोन्ही ठिकाणी पोलिसांकडून चोक पोलोस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.