चांदा ते बांदा योजनेतून तिलारी जंगल सफारी बोट उपलब्ध

0
199

 

सिंधुदुर्ग – तिलारी आंतरराज्य प्रकल्प पर्यटन आणि जंगल सफारीसाठी चांदा ते बांदा योजनेतून “तिलारी जंगल सफारी’ बोट उपलब्ध झाली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाल्यावर पावसाळ्यानंतर पर्यटनाला पुरक बोट ठरणार आहे.

कोरोनाच्या संकटानंतर ही बोट पर्यटनासाठी देखील उपयुक्त असून हेवाळे संस्थेकडे बोट सुपूर्द केली आहे. माजी अर्थराज्यमंत्री तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी “चांदा ते बांदा’ योजनेतून विशेष निधी दोडामार्ग वनक्षेत्रपाल यांना मंजूर केले होते. यामधून 12 प्रवासी वाहतुकीची इंजिन असणारी बोट निर्माण केली आहे. त्यामध्ये दहा पर्यटक बसतील त्यासाठी जॅकेट व अन्य सुविधा देखील असतील, असे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी सांगितले.

तिलारी पाटबंधारे धरणाच्या येथे जंगल सफारीसाठी पर्यटकांना ही उपयुक्त असून तिलारी जंगल सफारी म्हणून या बोटचे नामकरण केले आहे. वनखात्यासाठी जंगलाच्या संरक्षणाला देखील या बोटीचा फायदा होईल, असे उपवनसंरक्षक चव्हाण आणि सहाय्यक वनसंरक्षक इस्माईल जळगावकर यांनी बोलताना सांगितले. पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत नुकत्यात या बोटीची चावी हेवाळे संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहे. कोरोनाच्या संकटातून सुटका झाली तर पावसाळ्यानंतर या बोटीचा पर्यटकांना जलविहार करण्यासाठी फायदा होईल, अशी शक्‍यता वनखात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे बोट पर्यटनाला उपयुक्त ठरेल, असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here