गोव्यात ये-जा करणाऱ्या नोकरदारांना मिळणार पास, नियमित होणार तपासणी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांची माहिती

0
133

 

सिंधुदुर्ग – गोव्यात नोकरीनिमित्त ये-जा करणाऱ्या लोकांसाठी आम्ही पासची व्यवस्था केलेली आहे. मात्र ते गोव्यातून परतत असताना त्यांची तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी दिली आहे.

दरम्यान गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांनी आवश्यक असलेल्या पाससाठी आपले आधार कार्ड व ओळखपत्र संबंधित ग्रामपंचायतीकडे जमा करावे. त्या ठिकाणी आम्ही पास पुरवण्याची व्यवस्था करू, त्यासाठी तहसीलदार कार्यालयात येण्याची गरज नाही,असे आवाहन सावंतवाडीचे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी केले आहे.याबाबत त्यांनी माहिती दिली.अनेक लोकांची पासमुळे अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे महाराष्ट्र शासनाने गोव्यातून येणाऱ्या पर्यटकांची थर्मल स्कॅनिंग करण्याचे आदेश दिल्याने सिंधुदुर्ग-गोवा सीमेवर बांदा टोलनाका येथे थर्मल स्कॅनिंग सुरू करण्यात आले आहे. दरम्यान स्थानिकांना यामधून सूट देण्यात आली असली तरी गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या लोकांची ते मागे परतल्यावर मात्र तपासणी होणार आहे. सीमेवर आरोग्य, महसूल व पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे. थर्मल स्कॅनिंगमुळे सीमेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत.

दरम्यान यावेळी बोलताना सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले, गोव्यात नोकरीनिमित्त जाणाऱ्या लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही पासची व्यवस्था केली आहे. त्यांनी जवळच्या ग्रामपंचायतीतून पास घ्यावा. मागच्यासारखी कुणाचीही अडवणूक होणार नाही असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here