गोमेकॉचा नंबर देशात २३ वा, देशातील २५ उत्‍कृष्‍ट महाविद्यालयांमध्‍ये गोमेकॉचा सहभाग

0
70

पणजी: गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि इस्‍पितळ बांबोळी येथे गेल्‍या काही वर्षांपासून अनेक सुधारणा होत आहेत. येथील शिक्षणाचा दर्जा सुधारण्‍याचा तर प्रयत्‍न केला जातच आहे शिवाय साधनसुविधांवरही भर दिला जात आहे. याचाच प्रत्‍यय करिअर्स ३६० मॅगेझीन यांनी केलेल्‍या सर्वेक्षणादरम्‍यान दिसून आला आहे. भारतातील सर्वात चांगल्‍या ७० सरकारी महाविद्यालयांमध्‍ये गोमेकॉचा क्रमांक २३ वा लागत असल्‍याची माहिती त्‍यांनी जाहीर केली आहे. करिअर ३६० ने दिलेल्‍या या निर्णयानंतर आम्‍हाला अतिशय आनंद झाला असून आम्‍ही आमचा हा प्रवास असाच सुरू ठेवणार असल्‍याच्‍या प्रतिक्रिया गोमेकॉ व्‍यवस्‍थापनाने व्‍यक्‍त केल्‍या आहेत.

३६० मॅगझीन या संस्‍थेकडे शिक्षण क्षेत्राचा मार्गदर्शक म्‍हणून पाहिले जाते. काही वर्षांपुर्वी त्‍यांनी केलेल्‍या पाहणीत गोमेकॉचा क्रमांक देशात ६७ वा होता. मात्र आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्‍या नेतृत्‍वाखाली गोमेकॉचा विस्‍तार वाढत आहे आणि त्‍याचेच हे सकारात्‍मक परिणाम लोकांसमोर येत आहेत, त्‍यामुळे त्‍यांचे करावे तितके अभिनंदन आणि आभार थोडेच आहेत. गोमेकॉतील सर्व कर्मचारी, डॉक्‍टर आणि विद्यार्थ्यांचाही या प्रवासात मोलाचा वाटा असल्‍याचे मत गोमेकॉतचे प्रभारी डीन आणि वैद्यकीय अधिक्षक शिवानंद बांदेकर यांनी व्‍यक्‍त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here