खारेपाटण तावडेवाडी येथे भूस्खलन, ६ कुटुंबासह ३३ नागरिकांना केले स्थलांतरित

0
256

सिंधुदुर्ग :गेले दोन दिवसांपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे भूस्खलन झाले आहे. सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यातील खारेपाटण मधील जवळ असलेल्या डोंगर भागात तावडेवाडी येथे आज घराच्या बाजूला व अंगणात जमिनीला तडे व भेगा गेल्या आहेत.त्याचप्रमाणे घरांच्या पाठीमागे काही प्रमाणावर दरड कोसळली आहे.यामुळे येथील नागरिक भयभीत झाले असून घटनेची माहिती मिळताच महसूल खडबडून जागी झाली आहे.

कणकवली तहसीलदार दीक्षित देशपांडे, नायब तहसीलदार श्री राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात बाबत प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार,खारेपाटण तावडेवाडी येथील रहिवासी असलेले बांधव आपल्या आपल्या कुटुंबासह या डोंगर भागात गेली १४ वर्षापासून राहत असून येथे त्यांची ५ घरे असून ६ कुटुंबासह ३३ माणसे येथे राहत आहेत. परंतु काल आणि आज पासून पुन्हा सुरू झालेल्या मुसळधार पावसाने येथील डोंगरी व जंगल भागात राहत असलेल्या या नागरिकांच्या घराना तडे गेले आहे.त्यामुळे नागरीक पूर्णपणे घाबरले आहेत.त्या भागांमध्ये काही प्रमाणात दरडी कोसळत आहे. यामुळे या घराना मोठा धोका निर्माण झाला आहे.मात्र भविष्यात मोठा अपघात घडण्याची दाट शक्यता आहे.

आम्ही व्यवसायानिमित्त भटकत असलेली विस्थापित मोलमजुरी व मासेविक्री करून पोट भरणारे घोरपी समाजाची कुटुंबे असून आम्हला जिथे जागा मिळाली. तिथे आम्ही सद्या राहत आहोत.मात्र आमच्या जिवितला आता याठिकाणी धोका निर्माण झाला असून सरकारने आमचे पुनर्वसन करून आम्हाला पक्की घरे बांधून द्यावीत अशी या नागरिकांची मागणी आहे.

तावडेवाडी येथील नागरिकांच्या जिविताला धोका निर्माण होऊ नये म्हणून सदर नागरिकांची सद्या राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत करण्यात येईल.मात्र प्रशासनाने येथील नागरिकांच्या पुनर्वसन बाबत गांभीर्याने विचार करावा.स्थानिक ग्रामपंचायत म्हणून आम्ही सहकार्य करू अशी भूमिका सरपंच यांनी घेतली आहे.

प्रशासनाने अशा डोंगर दरी वस्तीत राहणाऱ्या नागरिकाचा सर्व्हे करून धोक्याच्या ठीकाणी त्यांना न ठेवता सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे अशी मागणी आता ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.सदर घटनेची माहिती मिळताच खारेपाटण सरपंच सौ प्राची ईस्वलकर यांनी याठीकणी प्रथम भेट देत नागरिकांना दिलासा दिला.यावेळी सामाजिक कार्यकर्ते श्री मंगेश गुरव,भेट देऊन भूस्खलनाची पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here